शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत भेटीपूर्वी पुतिन यांचे मोठे पाऊल; रशियाने भारतासोबत लष्करी कराराला दिली मान्यता
2
रुपयाची ऐतिहासिक घसरण! डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ९० च्या खाली, तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल?
3
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
4
किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० रुपये होणार का? सरकारने लोकसभेत दिलं उत्तर
5
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
6
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
7
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
8
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
9
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
10
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
11
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
12
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
13
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
14
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
15
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
16
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
17
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
18
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
19
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
20
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : न्यायालयाने दीपक झांबडचा जामीन अर्ज फेटाळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 01:32 IST

अकोला : शासनाच्या मालकीच्या २0 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळय़ातील मुख्य आरोपी दीपक झांबडचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळला. त्यामुळे झांबडला आता जामीन मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतल्याशिवाय पर्याय नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे२0 कोटींचा भूखंड घोटाळा प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या मालकीच्या २0 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळय़ातील मुख्य आरोपी दीपक झांबडचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळला. त्यामुळे झांबडला आता जामीन मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतल्याशिवाय पर्याय नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.  अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/ ‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून तब्बल २0 कोटी रुपये किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन हा भूखंड कागदोपत्री हडपण्याचा प्रकार करण्यात आला होता. हे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले व पाठपुरावा केल्यानंतर याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दीपक रमेश झांबड व रमेश गजराज झांबड यांच्यासह भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख गणेश अणे यांनी २३ डिसेंबर २0१७ रोजी दीपक झांबड व रमेश झांबड या दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयाने सात दिवसांची व नंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने आरोपीस १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपीने जामीन मिळविण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज सादर केला. न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे झांबडचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

भूमी अभिलेख कर्मचार्‍यांची चौकशीभूमी अभिलेख विभागातील कर्मचार्‍यांनी हा घोटाळा केल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे या घोटाळय़ात सहभागी असलेल्या कर्मचार्‍यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मगर व काळे नामक कर्मचारी यामध्ये सहभागी असल्याचा पोलिसांना संशय असून, त्यांनी या दोघांचीही चौकशीस प्रारंभ केला आहे. काळे व काँग्रेस नगरसेविकेच्या पतीने घातलेला दुसर्‍या भूखंडाचा घोटाळाही आता लवकरच समोर येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरCourtन्यायालयCrimeगुन्हा