शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

अकोला शहरात पाणी पुरवठय़ाच्या कामाची ऐशीतैशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 11:40 PM

अकोला : मोठा गाजावाजा करीत शहरात ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणी पुरवठय़ाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. अवघा महिना होत नाही, तोच कंत्राटदाराने त्याच्या मनमानी कारभाराची चुणूक दाखविण्यास सुरुवात केल्याचा प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देकंत्राटदाराचा निकष, नियमांना ठेंगा‘अमृत’ योजनेच्या कामांवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मोठा गाजावाजा करीत शहरात ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणी पुरवठय़ाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. अवघा महिना होत नाही, तोच कंत्राटदाराने त्याच्या मनमानी कारभाराची चुणूक दाखविण्यास सुरुवात केल्याचा प्रकार समोर आला आहे. चार इंच जलवाहिनीसाठी किमान साडेतीन फूट खोल खोदकाम करणे अपेक्षित असताना चक्क दीड ते पावणेदोन फूट खोलीवर जलवाहिनीचे जाळे टाकण्याचा प्रयत्न प्रभाग १५ मधील भाजपाच्या नगरसेविका शारदा खेडकर यांनी उधळून लावला आहे.केंद्र शासनाच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत शहराची पाणी पुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी ११0 कोटी ८४ लाखांच्या प्रस्तावापैकी ८७ कोटींच्या निविदेला शासनाने मंजुरी दिली. मनपा प्रशासनाने ‘एपी अँण्ड जीपी’ असोसिएट्स कंपनीची सहा टक्के जादा दराने सादर केलेली निविदा स्वीकारून कंपनीला कार्यादेश दिले. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस कंपनीने जलवाहिनीचे जाळे टाकण्याच्या कामाला सुरुवात केली. शहरात जलवाहिनीचे जाळे टाकणे व आठ ठिकाणी जलकुंभांची उभारणी करण्यासाठी कंपनीला दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे. अर्थात, सर्व कामकाज निकष व नियमानुसार करण्याची गरज असताना कंत्राटाराने त्याच्या मनमानी कारभाराला सुरुवात केल्याचा प्रकार प्रभाग १५ मधील आदर्श कॉलनी परिसरात समोर आला आहे. आदर्श कॉलनीमध्ये चार इंच जलवाहिनी टाकण्यासाठी कि मान साडेतीन फूट खोदकाम करण्याची गरज असताना कंत्राटदाराकडून चक्क दीड ते पावणेदोन फूट खोलीवर जलवाहिनी टाकली जात असल्याचे भाजप नगरसेविका शारदा खेडकर यांच्या निदर्शनास आले. त्यासंदर्भात त्यांनी तडकाफडकी काम थांबवत जलप्रदाय विभागाला सूचित केले. 

मजीप्राला जबाबदारीचा विसर?‘अमृत’ योजनेंतर्गत पाणी पुरवठय़ाच्या कामाचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणे आणि त्यावर तांत्रिक सल्लागार म्हणून शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नियुक्ती केली. शहराचे भविष्य व योजनेचे महत्त्व लक्षात घेता मजीप्राने डोळ्यात तेल घालून पाणी पुरवठय़ाच्या कामावर देखरेख ठेवणे अपेक्षित असताना आदर्श कॉलनीमधील कामावर मजीप्रासह महापालिकेचा अभियंता उपस्थित नसल्याचे समोर आले आहे. 

अभी दिल्ली बहुत दूर है!‘अमृत’ योजनेंतर्गत महान धरण ते अकोला शहरापर्यंतची १६१ कि.मी.ची मुख्य जलवाहिनी बदलण्यासह शहरात जुन्या जलवाहिनीच्या बदल्यात २६५ कि.मी.ची नवीन जलवाहिनी टाकल्या जाणार आहे. तसेच शहराच्या विविध भागात आठ जलकुं भांची उभारणी केली जाईल. योजनेचा आवाका व कंत्राटदाराचा ढिसाळ कारभार पाहता ‘अभी दिल्ली बहुत दूर है’, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाWaterपाणी