शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

अकोला : महान धरणाने गाठला तळ; धरणात केवळ १६.७९ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 10:19 PM

अकोला शहरासाठी महत्त्वाचे असलेल्या महान धरणाने डिसेंबरमध्ये तळ  गाठल्याचे चित्र असून, धरणात ११ डिसेंबर रोजी केवळ १६.७९ टक्के जलसाठा  उपलब्ध आहे. अल्प जलसाठय़ामुळे मूर्तिजापूर शहर आणि ६४ खेडी पाणीपुरवठा  योजनेला धरणातून पाणी देणे बंद करण्यात आले आहे. तसेच यावर्षी  सिंचनासाठीही पाणी मिळाले नाही. 

ठळक मुद्देअकोला शहरासाठी पाणी आरक्षितमूर्तिजापूर शहर व ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद

लोकमत न्यूज नेवटर्कमहान : अकोला शहरासाठी महत्त्वाचे असलेल्या महान धरणाने डिसेंबरमध्ये तळ  गाठल्याचे चित्र असून, धरणात ११ डिसेंबर रोजी केवळ १६.७९ टक्के जलसाठा  उपलब्ध आहे. अल्प जलसाठय़ामुळे मूर्तिजापूर शहर आणि ६४ खेडी पाणीपुरवठा  योजनेला धरणातून पाणी देणे बंद करण्यात आले आहे. तसेच यावर्षी  सिंचनासाठीही पाणी मिळाले नाही. 

या वर्षी महान धरणाच्या परिसरात अल्प पाऊस झाल्याने १ जून ते १५ ऑ क्टोबरदरम्यान धरणाचा जलसाठा केवळ २१.३१ पर्यंत पोहोचला होता. ११  डिसेंबर रोजी धरणात ३४0.४७ मीटर, १५.५0५ द.ल. घ. मीटर १६.७९ टक्के  एवढा जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हाच जलसाठा ३४६.८५  मीटर, ७२.६३२ द.ल.घ. मीटर व ८४.११ एवढा जलसाठा होता. या तुलनेत महान  धरणात यावर्षी एकूण ६७ टक्के जलसाठा कमी आहे. अल्प जलसाठय़ामुळे  धरणातील काही ठिकाणच्या टेकड्या उघड्या पडल्या आहेत. तर धरणाचे पाणी  नदी पात्रात सोडणे बंद केले असल्यामुळे महान काटेपूर्णा नदी पात्र कोरडे पडले  आहे.  

तिसरा व्हॉल्व्ह उघडा पडण्याच्या मार्गावरअकोला शहराला पाणी पुरवठा करण्याकरिता महान धरणात एकूण पाच व्हॉल्व्ह  बसवण्यात आले आहेत. यापैकी दोन व्हॉल्व्ह आधीच उघडे पडले असून, तिसरा  व्हॉल्व्हही उघडा पडण्याच्या मार्गावर आहे. या व्हॉल्व्हवर केवळ एक ते दीड  फुटापर्यंत पाणी आहे. पाटबंधारे विभाग बोरगाव मंजूचे सहायक अभियंता अभिजित  नितनवरे यांनी धरणातील पाण्याची परिस्थिती बघता मत्स्य बीज केंद्र  जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाण्याचे व्यवस्थित व काटकसरीने नियोजन  करण्याचे निर्देश दिले.

शेतकर्‍यांचा पाणी उपसा बंदधरणातील पाणी पातळी बघता जलसाठा अकोला शहराला राखीव ठेवण्यात आला  आहे. त्यामुळे धरणातील व नदीमधील पाण्याचा उपसा होऊ नये, याकरिता धरणा तील परवानाधारक शेतकर्‍यांचे तसेच महान धरण ते उन्नई बंधारादरम्यान  परवानाधारक शेतकर्‍यांचे मोटार पंपाचे वीज कनेक्शन ऑगस्ट महिन्यातच का पण्यात आले. त्यामुळे, यावर्षी शेतकर्‍यांना रब्बी व उन्हाळी हंगामापासून वंचित  राहावे लागले आहे. पाण्याचा उपसा कोणी करू नये, याकरिता वेळोवेळी महान  पाटबंधारे विभागाचे कर्मचारी पाहणी करीत आहेत. महान धरणाच्या  जलसाठय़ाकडे सहायक अभियंता अभिजित नितनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली  शाखा अभियंता सैयद जानोरकार, पाठक, पिंपळकर, शिराळे, हातोलकर, अजीज  खरात, अकबर शहा, झलके हे लक्ष ठेवून व्यवस्थित नियोजन करीत आहेत. 

टॅग्स :Katepurna Damकाटेपूर्णा धरणAkola cityअकोला शहरMurtijapurमुर्तिजापूरwater transportजलवाहतूक