महान भागविणार चार महिने तहान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 02:00 AM2017-09-08T02:00:37+5:302017-09-08T02:02:20+5:30

यंदा पावसाने मारलेली दडी आणि महान  धरणातील उपलब्ध जलसाठा लक्षात घेता शहरावरील  जलसंकटाचे ढग गडद झाले आहेत. महान धरणात  केवळ १५.४२ टक्के एवढा जलसाठा शिल्लक असून, या तून अकोलेकरांना चार महिन्यापर्यंत पाणीपुरवठा केला  जाऊ शकतो. शहरावरील संभाव्य जलसंकट पाहता  नागरिकांनी पाण्याची नासाडी टाळून काटकसरीने वापर  करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

Four months of great devotion will thirst! | महान भागविणार चार महिने तहान!

महान भागविणार चार महिने तहान!

Next
ठळक मुद्देशहरावरील जलसंकटाचे ढग गडद महान धरणात केवळ १५.४२ टक्के एवढा जलसाठा  शिल्लक

आशिष गावंडे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : यंदा पावसाने मारलेली दडी आणि महान  धरणातील उपलब्ध जलसाठा लक्षात घेता शहरावरील  जलसंकटाचे ढग गडद झाले आहेत. महान धरणात  केवळ १५.४२ टक्के एवढा जलसाठा शिल्लक असून, या तून अकोलेकरांना चार महिन्यापर्यंत पाणीपुरवठा केला  जाऊ शकतो. शहरावरील संभाव्य जलसंकट पाहता  नागरिकांनी पाण्याची नासाडी टाळून काटकसरीने वापर  करण्याची गरज निर्माण झाली आहे. 
अकोलेकरांना महान (काटेपूर्णा प्रकल्प) धरणातून  पाणीपुरवठा केला जातो. धरणातील पाण्यावर महान ये थील जलशुद्धीकरण केंद्रावर प्रक्रिया केल्यानंतर ९00  व्यासाच्या मुख्य जलवाहिनीद्वारे शहरातील  जलकुंभांमध्ये पाण्याची साठवणूक केली जाते. यंदा मात्र  जलसंकटाची दाट शक्यता दिसून येत आहे. 
जून महिन्यापासून ते आजपर्यंत पावसाच्या तीन  महिन्यांच्या कालावधीत अद्यापही समाधानकारक  पाऊस न झाल्यामुळे धरणातील जलसाठय़ात किंचितही  वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. आगामी दिवसांत  पाऊस आल्यास जिल्ह्यातील मोठे प्रकल्प, लघू  प्रकल्पातील जलसाठय़ात कि ती वाढ होईल, याबाबत  साशंकता आहे. आजरोजी महान धरणात १५.४२ टक्के  जलसाठा शिल्लक आहे. 
धरणातील उपलब्ध जलसाठा व पावसाचा अंदाज पाह ता महापालिकेच्या जलप्रदाय विभागाच्यावतीने पाणी पुरवठय़ात कपात करून नागरिकांना दर आठव्या दिवशी  पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन वेळापत्रक तयार केले  असून, त्यानुसार पाणीपुरवठा केला जात आहे. या वेळा पत्रकानुसार आणि उपलब्ध जलसाठा पाहता  अकोलेकरांना चार महिन्यांपर्यंत पाणीपुरवठा करणे  महापालिकेला शक्य आहे. त्यानंतर पर्यायी स्त्रोतांचा  अवलंब करावा लागणार आहे. 
महापालिका पर्यायी स्रोतांची पाहणी करीत असून हे स्रो तही अपुर्‍या पावसामुळे पुरेसे ठरतील की नाही, ही  शंकाच आहे. अशा स्थितीमध्ये अकोलेकरांनीच  पाण्याचा काटकसरीचा मार्ग आतापासून स्वीकारला  पाहिजे. 

नागरिकांनो, परतीचा पाऊस साठवा!
रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर देण्याची गरज
अपुर्‍या पावसामुळे यावर्षी पावसाळा संपण्याच्या आधीच  पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. अकोला शहरात  आठ दिवसांआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला  असून, केवळ डिसेंबरपर्यंत पुरेल एवढाच जलसाठा  आहे. मूर्तिजापूरसाठी तातडीने पर्यायी व्यवस्था शोधली  जात आहे, तर खांबोरा योजनेवरील ६१ गावांसाठी  टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. ही स्थिती पुढील  संकटाची चाहूल देणारी आहे. पावसाचे काहीच दिवस  शिल्लक असून, वरुणराजाने कृपा केली, तर जाता-जा ता सर्व धरणे भरून जातील, एवढाही पाऊस येऊ शक तो; मात्र केवळ याच आशेवर थांबून चालणार नाही. पर तीचा पाऊस पडेल व वाहून जाईल, असे होता कामा  नये. यासाठी अकोलेकरांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर  दिला पाहिजे. परतीचा पाऊस नक्कीच हजेरी लावेल,  असे अंदाज हवामान विभागाने दिले आहेत, त्यामुळे या  पावसाचे पाणी साठवता आले, तर किमान भूजल पा तळी वाढण्यास मदत होऊन पाणीटंचाईचे संकट  काहीअंशी कमी होऊ शकते. रेन वॉटर हार्वेस्टिंगसोब तच विंधन विहीर पुनर्भरणाचाही उपक्रम राबविला  पाहिजे. प्रत्येकाने आपल्या घरातील बोअरची पातळी  वाढेल, ते बोअर पुन्हा रिचार्ज होईल, एवढी काळजी तरी  परतीच्या पावसात घेतली, तर त्या कुटुंबापुरता पाण्याचा  प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते.

संभाव्य पाणीटंचाईचे सावट लक्षात घेऊन पर्यायी  जलस्त्रोतांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी जल प्रदाय विभागाची यंत्रणा आतापासूनच कामाला लागली  आहे. प्रशासन प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असले तरी  पाण्याच्या काटकसरीसाठी अकोलेकरांनी साथ देणे अ पेक्षित आहे.
- अजय लहाने, आयुक्त, मनपा

Web Title: Four months of great devotion will thirst!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.