अकोला-अमरावती महामार्गावर टँकरने कारला चिरडले; दोन ठार, तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 16:16 IST2017-12-23T15:47:17+5:302017-12-23T16:16:21+5:30
अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथून नागपूरकडे जाणाºया कारला विरुद्ध दिशेने येणाºया पेट्रोलच्या टँकरने धडक देऊन झालेल्या अपघातात कारमधील दोन जण ठार, तर तीन जण जखमी झाले.

अकोला-अमरावती महामार्गावर टँकरने कारला चिरडले; दोन ठार, तीन जखमी
अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथून नागपूरकडे जाणाºया कारला विरुद्ध दिशेने येणाºया पेट्रोलच्या टँकरने धडक देऊन झालेल्या अपघातात कारमधील दोन जण ठार, तर तीन जण जखमी झाले. अकोला-अमरावती महामार्गावर बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत नवीन बायपास जवळ दुपारी १२.३० वाजताचे सुमारास ही घटना घडली. अपघातग्रस्त कुटुंब नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथील असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथील एक कुटुंब शेगावला गेले होते. तिकडून परत येत असताना बोरगाव मंजू नजीक त्यांच्या एम.एच. ४० ए. १७६८ क्रमांकाच्या अल्टो कारला विरुद्ध दिशेने येणाºया पेट्रोलच्या टँकरने ( एम.एच.२९ टी. ६५१) जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, यामध्ये कारचा चुराडा झाला. या अपघातात प्रविण भिखूलाल चौकसे यांचा जागीच मृत्यू झाला. मृतकाच्या खिशातून पोलिसांना लायसन मिळाले असून, त्यावर प्रविण भिखूलाल चौकसे, राहीनगर, कन्हान ता. पारशिवनी, जि. नागपूर असा उल्लेख आहे. या घटनेत आणखी एका पुरुषाचाही मृत्यू झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून, एक मुलगा व मुलगी देखील जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी अकोला येथे पाठविले. जखमींवर एका खासगी इस्पितळात उपचार सुरु आहेत. तर मृतकांना सर्वोपचार रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.