अकोला-अमरावती महामार्गावर भरधाव ट्रकची दोन दुचाकींना धडक, ३ ठार
By Atul.jaiswal | Updated: December 25, 2017 19:04 IST2017-12-25T14:29:44+5:302017-12-25T19:04:40+5:30
अकोला : अकोल्याहून मुर्तीजापूरकडे जात असलेल्या भरधाव टिप्परने अकोल्याच्या दिशेने येत असलेल्या दोन दुचाकींना जारेदार धडक दिली. अकोला एमआयडीसी परिसरातील अप्पु पुतळ्याजवळ दुपारी २ वाजताच्या सुमारास लेल्या या अपघातात एका दुचाकीवरी दोन जण जागीच ठार झाले.

अकोला-अमरावती महामार्गावर भरधाव ट्रकची दोन दुचाकींना धडक, ३ ठार
अकोला : अकोल्याहून मुर्तीजापूरकडे जात असलेल्या भरधाव ट्रकने अकोल्याकडे येत असलेल्या दोन दुचाकींना जारेदार धडक दिल्याची घटना सोमवारी दुपारी २ वाजता घडली. या अपघातात शिवणी येथील राहुल नगरमधील दोघे तर एक जन हिंगना रोडवरील रहिवासी असे तीघे जन ठार झाले आहेत.
अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ चे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. या कामामूळे अकोला ते बाभुळगाव परिसरात रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यामूळे रोजच कीरकोळ अपघात होत आहेत. याच रोडवरील साहित्याची ने आण करण्यासाठी असलेल्या एम. एच. ३० ए. व्ही. १०५६ क्रमांकाचा ट्रक मुर्तीजापूरच्या दिशेने जात असताना शिवणी विमानतळासमोर रस्त्यावरील मोठया खड्डयांमूळे चालकाचे नियंत्रण सुटले व त्याने विरुद्ध दिशेने येणाºया एम. एच. ३० ए. डी. ४२४५ व एम. एच. ३० झेड ५२६२ क्रमांकाच्या दोन दुचाकींना जबर धडक दिली. या अपघातात पुरवठा विभागात कार्यरत असलेले विनायक पंजाबराव वानखडे रा. हिंगना रोड, गजानन गोवींदराव सदांशिव रा. राहुल नगर शिवणी, श्रीकृष्ण दौलत तायडे रा. राहुल नगर शिवणी हे दुचाकीवरील तिघेही जन ठार झाले. शिवणी विमानतळाजवळ अप्पू पुतळ्यासमोर हा अपघात घडल्यानंतर नागरिकांनी धाव घेउन मृतक जखमी असल्याच्या कारणावरुन त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात पाठवीला, यामधील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला होता, तर तीसºया व्यक्तीचा सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके यांनी कर्मचाºयांसह घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी पळून जाण्याच्या बेतात असलेला ट्रक चालक राजेंद्र सिंग रा. झारखंड याला पोलिसांनी व नागरिकांनी ताब्यात घेतले. यावेळी अपघात झाल्यानंतर त्यांना मदत करण्यासाठी बाभूळगाव येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उन्मेष रिंंगणे, वैभव डोंगरे, संतोष भाकरे यांनी सहकार्य केले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक विस्कळित झाली होती. मात्र पोलिसांनी तातडीने अपघातग्रस्त वाहने रोडच्या बाजुला करीत ही वाहतुक सुरळीत केली.
दोन दुचाकीवर बोलत जाणे धोक्याचे
दोन्ही दुचाकीवरील व्यक्ती या बोलत दुचाकी चालवीत राष्ट्रीय महामार्गावरून जात असल्याची माहिती ट्रकचालकाने दिली. शहरात तसेच राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकीवर दुचाकी चालवित असतांना गोष्टी करीत जाणारे आपल्याला नेहमीच दिसतात, अशाच प्रकारातून हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.