अचानक आवाज; सर्वत्र धूर, पाचव्या मजल्याहून उतरले अन् मी वाचले, अकोल्यातील डॉ. ऐश्वर्या तोष्णीवाल सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 11:07 IST2025-06-14T11:07:02+5:302025-06-14T11:07:24+5:30

Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये डाॅक्टरांच्या वसतिगृहावर एअर इंडियाचे विमान कोसळून गुरुवारी भीषण अपघात झाला. त्यामध्ये येथील ‘डीएम ऑन्काॅपॅथाॅलाॅजी’च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेली अकोला शहरातील रहिवासी डाॅ. ऐश्वर्या तोष्णीवाल ही विद्यार्थिनी थोडक्यात बचावली आहे.

Air India Plane Crash: Suddenly there was a noise; smoke everywhere, I came down from the fifth floor and survived. | अचानक आवाज; सर्वत्र धूर, पाचव्या मजल्याहून उतरले अन् मी वाचले, अकोल्यातील डॉ. ऐश्वर्या तोष्णीवाल सुखरूप

अचानक आवाज; सर्वत्र धूर, पाचव्या मजल्याहून उतरले अन् मी वाचले, अकोल्यातील डॉ. ऐश्वर्या तोष्णीवाल सुखरूप

अकोलाअहमदाबादमध्ये डाॅक्टरांच्या वसतिगृहावर एअर इंडियाचे विमान कोसळून गुरुवारी भीषण अपघात झाला. त्यामध्ये येथील ‘डीएम ऑन्काॅपॅथाॅलाॅजी’च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेली अकोला शहरातील रहिवासी डाॅ. ऐश्वर्या तोष्णीवाल ही विद्यार्थिनी थोडक्यात बचावली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत संबंधित विद्यार्थिनीचे वडील अमोल तोष्णीवाल यांच्याशी शुक्रवारी संपर्क साधण्यात आला असून, मुलगी सुरक्षित असल्याची माहिती वडिलांनी प्रशासनाला दिली.

भीषण दुर्घटनेत शिकाऊ डाॅक्टरांसह २४ जणांचाही मृत्यू झाला आहे. ज्या वसतिगृहाच्या परिसरात दुर्घटना घडली, त्याच परिसरातील एका इमारतीमध्ये अकोल्यातील डाॅ. ऐश्वर्या अमोल तोष्णीवाल हीदेखील राहत होती. ती येथील गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ‘डी.एम. ऑन्काॅपॅथाॅलाॅजी’च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. या घटनेची भीषणता तिने कुटुंबियांना कळविली.

...अन् जीव वाचविला 
अपघात घडला त्यावेळी ऐश्वर्या हाॅस्टेलच्या दुसऱ्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर होती. विमान दुर्घटनेत अचानक मोठा आवाज झाला आणि सर्वत्र धुराचे लोट पसरले होते.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच ती अंगावर चादर घेऊन पाचव्या मजल्यावरून खाली उतरली व तिने स्वत:चा जीव वाचविला.  

‘दुर्घटनेनंतर तिचा फोन आला तेव्हा घाबरलो’
विमान दुर्घटनेनंतर मुलगी डाॅ. ऐश्वर्या हिचा गुरुवारी फोन आला तेव्हा जीव घाबरला होता, सुचेनासे झाले होते. व्हिडीओ काॅलद्वारे कुटुंबीयांचे तिच्याशी बोलणे झाल्यानंतर आणि मुलगी सुखरूप असल्याने दिलासा मिळाला, असे डाॅ. ऐश्वर्या यांचे वडील अमोल तोष्णीवाल यांनी सांगितले.

Web Title: Air India Plane Crash: Suddenly there was a noise; smoke everywhere, I came down from the fifth floor and survived.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.