कृषिमंत्री बुधवारी अकोल्यात; खरीप पूर्वतयारीची विभागीय बैठक घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 16:53 IST2020-05-26T16:51:54+5:302020-05-26T16:53:26+5:30

कृषिमंत्री दादाजी भुसे बुधवार, २७ मे रोजी अकोला दौऱ्यावर येत आहेत.

Agriculture Minister in Akola on Wednesday | कृषिमंत्री बुधवारी अकोल्यात; खरीप पूर्वतयारीची विभागीय बैठक घेणार

कृषिमंत्री बुधवारी अकोल्यात; खरीप पूर्वतयारीची विभागीय बैठक घेणार

ठळक मुद्देखरीप हंगाम पूर्वतयारीची विभागीय आढावा बैठक ते घेणार आहेत.बैठकीनंतर सकाळी १० वाजता कृषिमंत्री औरंगाबादकडे रवाना होणार आहेत.

अकोला : कृषिमंत्री दादाजी भुसे बुधवार, २७ मे रोजी अकोला दौऱ्यावर येत असून, सकाळी ८.३० जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खरीप हंगाम पूर्वतयारीची विभागीय आढावा बैठक ते घेणार आहेत.
अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ इत्यादी पाचही जिल्ह्यातील जिल्हानिहाय खरीप हंगामपूर्व तयारी आणि कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा कृषिमंत्री दादाजी भुसे अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित या आढावा बैठकीत विभागातील पाचही जिल्ह्यांचे संबंधित अधिकारी सहभागी होणार आहेत. आढावा बैठकीनंतर सकाळी १० वाजता कृषिमंत्री औरंगाबादकडे रवाना होणार आहेत.

 

Web Title: Agriculture Minister in Akola on Wednesday