शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

‘पीडीकेव्ही’मध्ये कृषी वैज्ञानिकांची कार्यक्षमता आणि प्रभाव प्रशिक्षण कार्यक्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:23 PM

दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे मंगळवारी उद््घाटन करण्यात आले.

अकोला : उद्योजकता परिसंस्था विकसित करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘कृषी वैज्ञानिकांची कार्यक्षमता आणि प्रभाव’ या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे मंगळवारी उद््घाटन करण्यात आले.राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषदद्वारा संचालित कृषी संशोधन व्यवस्थापन अकादमी, हैद्राबाद यांच्यातर्फे ‘उद्योजकता परिसंस्था विकसित करण्यासाठी कृषी वैज्ञानिकांची कार्यक्षमता आणि प्रभाव यामध्ये वाढ करणे’ या विषयावर दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता (कृषी) डॉ. पी. जी. इंगोले यांच्या हस्ते मंगळवारी कार्यशाळेचे उद््घाटन झाले. २० फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये २७ प्रशिक्षणार्थींनी नोंदणी केली आहे. यावेळी डॉ. के. एच. राव, कार्यक्रम संचालक आणि समन्वयक (कॉपोर्रेट रिलेशनशिप सेल) व डॉ. बी. एस. सोनटक्की, विभागप्रमुख (विस्तार प्रणाली व्यवस्थापन) कृषी संशोधन व्यवस्थापन अकादमी हैद्राबाद, डॉ. व्ही. के. खर्चे, डॉ. डी. एम. मानकर, डॉ. एस. एस. हरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. आभार डॉ. विवेक खांबालकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. धीरज कराळे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ