विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांचे मूर्तिजापूर तहसील कार्यालयासमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 12:57 PM2021-06-22T12:57:17+5:302021-06-22T12:57:24+5:30

Agitation of Asha workers : तहसील कार्यालयासमोर धरणे देऊन विविध मागण्यांसाठी सोमवारी तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे.

Agitation of Asha workers in front of Murtijapur tahsil office | विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांचे मूर्तिजापूर तहसील कार्यालयासमोर धरणे

विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांचे मूर्तिजापूर तहसील कार्यालयासमोर धरणे

Next

मूर्तिजापूर : आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांनी गत १५ तारखेपासून बेमुदत संप पुकारला असून येथील तहसील कार्यालयासमोर धरणे देऊन विविध मागण्यांसाठी सोमवारी तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे.
        आशा स्वयंसेविकांच्या कामाच्या वेळा लवचिक असून त्यांनी आपले घरदार सांभाळून आठलड्यातून चार दिवस २ ते ३ तास काम करावे असे त्यांच्या सेवाशर्ती मध्ये नमुद केले आहे. परंतू त्यांना रविवारसह आठवड्यातील सातही दिवस आठ तास काम करावे. त्यांच्या कडून हे काम विना मोबदला करुन घेण्यात येते. सद्यस्थितीत आशा सेविका व गट प्रवर्तक यांची परिस्थिती वेठबिगारीची असून शासकिय सेवेत कायम सामावून घ्यावे, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, पेन्शन, मेडिकल या सर्व योजना लागू कराव्यात या सारख्या विविध मागण्यांसाठी २१ जून रोजी तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे देऊन तहसीलदार प्रदीप पवार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. धरणे आंदोलनात तालुक्यातील शेकडो आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक  सहभागी झाल्या होत्या. निवेदनावर तालुका अध्यक्ष कविता डोंगरे,तालुका उपाध्यक्ष सुषमा चक्रे, तालुका सचिव छाया चक्रनारायण, सहसचिव ज्योती शिरसाठ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Agitation of Asha workers in front of Murtijapur tahsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.