आरोपींना पोलिस अधिकाऱ्यांचे अभय; अग्रवाल कुटुंबीयांचे एक दिवसीय धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 17:04 IST2019-03-26T17:03:59+5:302019-03-26T17:04:56+5:30
अकोला - जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जयहिंद चौकातील रहिवासी तथा वृत्तपत्र विक्रेते अग्रवाल कुटुंबीयांवर २०१७ मध्ये झालेल्या प्राणघातक ...

आरोपींना पोलिस अधिकाऱ्यांचे अभय; अग्रवाल कुटुंबीयांचे एक दिवसीय धरणे आंदोलन
अकोला - जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जयहिंद चौकातील रहिवासी तथा वृत्तपत्र विक्रेते अग्रवाल कुटुंबीयांवर २०१७ मध्ये झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणातील ८ आरोपींना जुने शहर पोलिस ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांनी पाठीशी घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तीन पोलिस अधिकाऱ्यांविरुध्द अग्रवाल कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करीत कारवाईची मागणी केली आहे.
जयहिंद चौकातील गोपाल अग्रवाल व ललीत अग्रवाल यांच्यावर मंगेश धोटे आणि सुनील ढाकरे यांच्यासह त्यांच्या ८ ते १० साथीदारांनी प्राणघातक हल्ला केला होता. तसेच त्यांच्या कुटुंबीयांची फसवणुकही करण्यात आली होती. या प्रकरणाची तक्रार अग्रवाल कुटुंबीयांनी जुने शहर पोलिस ठाण्यात केली होती. यावरुन जुने शहरचे तत्कालीन ठाणेदार अन्वर शेख यांना अंधारात ठेवत पीएसआय दिलीप पोटभरे आणि एपीआय हिरांसीह आडे यांनी १० मधील ८ आरोपींविरुध्द कारवाई न करता त्यांना अभय दिले तर केवळ दोघांविरुध्द गुन्हा दाखल करून प्रकरण रफादफा करण्याचा आरोप निवेदनात केला आहे. हिरासिंह आडे यांनी गोपाल अग्रवाल यांना ठाण्यात बोलावून गुन्हेगारासारखी वागणुक दिली तसेच दंडुकेशाहीच्या जोरावर अग्रवाल यांच्याकडून जबरदस्तीने समज पत्र लीहुन घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे. त्यामूळे या पोलिस अधिकाºयांचे सदर आरोपींशी संगणमत असल्याचा आरोप करीत या तीनही अधिकाºयांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अग्रवाल कुटुंबीय एक दिवशीय आंदोलन केले आहे.