शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगानंतर मुलीचे विष प्राशन

By admin | Updated: August 17, 2016 02:32 IST

पीडितेची प्रकृती अत्यवस्थ: आरोपी युवकास अटक.

अकोला / खेट्री, दि. १६: चान्नी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वरणगाव येथील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्यामुळे सदर मुलीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी घडली. या मुलीवर सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या प्रकरणी चान्नी पोलिसांनी आरोपी युवकास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.वरणगाव-चरणगाव येथील रहिवासी एका १३ वर्षीय मुलीचा आरोपी सागर प्रल्हाद कडू (२१) याने विनयभंग केला. त्यानंतर सदर मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. अचानकच घडलेल्या या प्रकारामुळे मुलीला धक्का बसल्याने तिने राहत्या घरातच विष प्राशन केले. यामुळे मुलीची प्रकृती गंभीर झाली असून, तिला तातडीने सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, तिची प्रकृती धोकादायक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी चान्नी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सागर कडू याच्याविरुद्ध ३५४, ४५२, ५0६ व पॉस्को अँक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी सागर फरार झाला. मात्र, चान्नी पोलिसांनी त्याला १६ ऑगस्ट रोजी अटक करून, न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस १९ ऑगस्टपयर्ंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास ठाणेदार वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत ममताबादे करीत आहेत.

ठाणेदारांनीच मुलीचे नाव उघड केले चान्नीचे ठाणेदार वैभव पाटील यांनी पीडित मुलीचे नाव तिच्या वडिलांचे नाव जातीसह सोशल मीडियावर अपलोड केले. त्यामुळे वरणगाव येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून, ठाणेदार पाटील यांच्याविरुद्ध वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. पीडित मुलीचे, महिलेचे नाव सोशल मीडिया, वृत्तपत्रात प्रकाशित न करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. मात्र त्यानंतरही ठाणेदार पाटील यांनी पीडित मुलीचे नाव एका व्हॉटस अँप ग्रुपवर टाकल्याने प्रचंड वादंग निर्माण झाले.