Advocate Cup Cricket Tournament: Akola 'A' Advocate Team ween | अ‍ॅडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धा : अकोला 'अ' वकील संघाला अजिंक्यपद
अ‍ॅडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धा : अकोला 'अ' वकील संघाला अजिंक्यपद

अकोला: राज्यस्तरीय अ‍ॅडव्होकेट चषक टी-२० लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेतील (पर्व ४) अंतिम सामना रविवारी अकोला अ वकील संघ व बीड वकील संघात सामना खेळला गेला. यामध्ये अकोला अ संघाने विजयाची परंपरा कायम राखत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
बीड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. १४ षटकांत सर्वबाद ४५ धावा बीड संघाने काढल्या. सुमित तिवारी याने ४ तर शीतलदास खिरवाल याने ३ गडी बाद केले. पवन बाजारे आणि रामस्वरू प परमार याने प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात अकोला संघाने अवघ्या ६ षटकांत लक्ष्य गाठून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अतुल सराग, पीयूष देशमुख, सागर महल्ले यांनी सुंदर फलंदाजी करीत ६ षटकांत २ बाद ४७ धावा काढून स्पर्धा जिंकली.
दरम्यान, दुसऱ्या सत्रात अकोला महिला वकील संघ आणि नागपूर महिला संघात प्रदर्शन सामना झाला. यामध्ये नागपूर संघाला विजयी घोषित करण्यात आले. सामना समाप्तीनंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला. अ‍ॅड़ महेंद्र शाह, अ‍ॅड़ मुन्ना खान आदी मान्यवरांच्या हस्ते विजेता-उपविजेता संघांना पारितोषिक प्रदान करण्यात आले, अशी माहिती आयोजक अ‍ॅड. अजय लोंढे यांनी दिली.
 

 

Web Title:  Advocate Cup Cricket Tournament: Akola 'A' Advocate Team ween

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.