पाणीटंचाई निवारणासाठी ३७ कामांना प्रशासकीय मंजुरी

By Admin | Updated: May 27, 2014 18:49 IST2014-05-26T23:55:11+5:302014-05-27T18:49:09+5:30

अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी सोमवारपर्यंत ३७ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकार्‍यांकडून प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

Administrative sanction to 37 works for reducing water shortage | पाणीटंचाई निवारणासाठी ३७ कामांना प्रशासकीय मंजुरी

पाणीटंचाई निवारणासाठी ३७ कामांना प्रशासकीय मंजुरी

अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी सोमवारपर्यंत ३७ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकार्‍यांकडून प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
यावर्षीच्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात जिल्ह्यातील १६८ गावांमध्ये १२५ उपाययोजना प्रस्तावित आहेत. या उपाययोजनांच्या कामांसाठी २ कोटी ८६ लाख २० हजारांचा खर्चही प्रस्तावित करण्यात आला आहे. पाणीटंचाई निवारणार्थ प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी आतापर्यंत ३६ गावांमध्ये ३७ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्याकडून प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये ९ विंधन विहिरी, १ तात्पुरती पूरक नळ योजना आणि २७ नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामांचा समावेश आहे.

Web Title: Administrative sanction to 37 works for reducing water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.