शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

आधार ‘लिंक’ नाही; शेतकऱ्यांची माहिती द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 13:47 IST

७६३ शेतकºयांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील तहसीलदारांकडून सोमवारपर्यंत मागविण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख १२ हजार ३७९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यापैकी १७ फेबु्रवारीपर्यंत १ लाख ११ हजार ६१६ शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आले आहे. बँक खाते क्रमांकाशी आधार ‘लिंक’ करण्यात आले नसलेल्या उर्वरित ७६३ शेतकºयांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील तहसीलदारांकडून सोमवारपर्यंत मागविण्यात आली आहे.शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत कर्ज थकीत असलेल्या शेतकºयांसाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील थकबाकीदार १ लाख १२ हजार ३७९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, पात्र ठरलेल्या शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांचे खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे काम गत दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहे. त्यामध्ये कर्जमाफीसाठी पात्र १ लाख १२ हजार ३७९ शेतकºयांपैकी १ लाख ११ हजार ६१६ शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आले असून, उर्वरित ७६३ शेतकºयांचे बँक खाते क्रमांक अद्याप आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आले नाही.त्यानुषंगाने बँक खाते क्रमांकाशी आधार क्रमांक ‘लिंक’ नसलेले शेतकरी संबंधित गावांत आहेत की नाही, संबंधित शेतकºयांचा पत्ता, बँक खाते क्रमांक व आधार क्रमांक प्राप्त झाले नाही, यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तहसीलदारांकडून सोमवार, २३ फेबु्रवारीपर्यंत माहिती मागविण्यात आली आहे.महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांपैकी बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी अद्याप ‘लिंक’ करण्यात आले नाही, अशा शेतकºयांची माहिती जिल्ह्यातील सातही तहसीलदारांकडून २३ फेबु्रवारी रोजी मागविण्यात आली आहे.- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :AkolaअकोलाAdhar Cardआधार कार्डFarmerशेतकरी