दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांवर कारवाई
By Admin | Updated: April 26, 2017 01:43 IST2017-04-26T01:43:23+5:302017-04-26T01:43:23+5:30
अकोला: देशी आणि विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक आणि विक्री करणाऱ्या तिघांवर सिव्हिल लाइन्स पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली.

दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांवर कारवाई
अकोला: देशी आणि विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक आणि विक्री करणाऱ्या तिघांवर सिव्हिल लाइन्स पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली. या तीनही दारू विक्रेत्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १३ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्याच्या पोलीस महासंचालकांनी दिलेल्या आदेशानंतर राज्यभर आॅपरेशन क्रॅक डाउन राबविण्यात येत आहे. हे आॅपरेशन जिल्ह्यातही राबविण्यात आले असून, या अंतर्गत सिव्हिल लाइन्स पोलिसांनी कारंजा येथील रहिवासी प्रशांत नागोराव डगवार हा देशी आणि विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करीत असताना त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८ हजार ३१० रुपयांची विदेशी दारू जप्त केली. दुसरी कारवाई सिव्हिल लाइन चौकामध्ये संदीप आत्माराम वानखडे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक हजार २०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली, तर तिसरी कारवाई सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनच्याच बाजूला असलेल्या आयएमए सभागृहाजवळ करण्यात आली. या कारवाईत विजय अजाबराव याच्याजवळून पोलिसांनी चार हजार ३२० रुपयांची विदेशी दारू जप्त केली.