मोठ्या आवाजात फटाके फोडणाऱ्या बुलेट चालकांविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 18:42 IST2020-12-13T18:42:23+5:302020-12-13T18:42:33+5:30

Akola News बुलेट चालकांवर कारवाई सुरू केली असून, या वाहनांचे सायलेन्सर काढण्यात येत आहेत.

Action against bullet drivers who explode loudly | मोठ्या आवाजात फटाके फोडणाऱ्या बुलेट चालकांविरुद्ध कारवाई

मोठ्या आवाजात फटाके फोडणाऱ्या बुलेट चालकांविरुद्ध कारवाई

अकोला : शहरात बुलेट चालकांची टाेळीच असून, या बुलेटच्या सायलेन्सरव्दारे मोठ्या आवाजात फटाके फोडणाऱ्या बुलेट चालविणाऱ्या तरुणांवर कारवाईसाठी पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेने माेहीम सुरू केली आहे. वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांनी बुलेट चालकांवर कारवाई सुरू केली असून, या वाहनांचे सायलेन्सर काढण्यात येत आहेत.

बुलेटच्या सायलेन्सरमध्ये काही बदल केल्यानंतर बुलेट जाेरात चालवून त्यानंतर रेस केली की फटाका फुटल्यासारखा आवाज येतो. रात्रीच्या सुमारास अशा बुलेट चालकांचा धुमाकुळ सुरू असताे. त्यामुळे आजारी माणसे व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाहतूक शाखेकडे करण्यात आलेल्या आहेत. यासंदर्भात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांना काही ज्येष्ठ नागरिकांनी फोनद्वारे तोंडी तक्रार केल्यानंतर गंभीर दखल घेऊन त्यांनी अशा वाहन चालकांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी ५ बुलेट चालकांवर कारवाई करीत वाहने जप्त करण्यात आले आहेत. शहरातील भौगोलिक परिस्थितीमुळे व रस्त्याचे कामकाज सुरू असल्याने अपुऱ्या मनुष्यबळामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यातच वाहतूक पोलिसांची धावपळ होते. तरुणांनी जबाबदार नागरिकांचे कर्तव्य म्हणून सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही ह्याची जाणीव ठेवून वाहन वापरावे असे आवाहन पाेलिसांनी केले आहे. तसेच फटाके फोडणाऱ्या बुलेट चालकांविरुद्ध कठाेर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पाेलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी दिली

Web Title: Action against bullet drivers who explode loudly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.