महिलेची पर्स पळविणाऱ्या आरोपीस अटक; आटोमधून पळवीली पर्स व रोकड
By सचिन राऊत | Updated: December 17, 2023 20:16 IST2023-12-17T20:16:35+5:302023-12-17T20:16:54+5:30
खैर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी मोहम्मद इमरान अब्दुल रशीद वय ३४ वर्ष या चोरट्याने शिवरकडे ऑटो मध्ये जात असलेल्या महिलेच्या पर्ससह तिच्या पर्समध्ये असलेले १५ हजार रुपये लंपास केले होते.

महिलेची पर्स पळविणाऱ्या आरोपीस अटक; आटोमधून पळवीली पर्स व रोकड
अकोला : मध्यवर्ती बस स्थानकावरून शिवर येथे ऑटाेने जात असलेल्या एका महिलेची पर्स व त्यामधील १५ हजार रुपये पळविणाऱ्या आरोपीस सिव्हिल लाईन्स पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा अटक केल केली.
खैर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी मोहम्मद इमरान अब्दुल रशीद वय ३४ वर्ष या चोरट्याने शिवरकडे ऑटो मध्ये जात असलेल्या महिलेच्या पर्ससह तिच्या पर्समध्ये असलेले १५ हजार रुपये लंपास केले होते. या प्रकरणी महिलेने सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला असता मोहम्मद इमरान अब्दुल रशीद यास संशयावरून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सिविल लाईन्स पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप शिरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.