दुहेरी हत्याकांडातील आरोपीची जामीनावर सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 11:27 IST2020-11-28T11:25:34+5:302020-11-28T11:27:57+5:30

नागपूर खंडपीठाने गुरुवारी जामीनावर सुटका केली.

Accused of double murder released on bail | दुहेरी हत्याकांडातील आरोपीची जामीनावर सुटका

दुहेरी हत्याकांडातील आरोपीची जामीनावर सुटका

ठळक मुद्देबाप-लेकाची २५ मे रोजी रात्रीच्या सुमारास निर्घण हत्या करण्यात आली होती.आरोपी सतिश इंगळे याचा जामीन अर्ज मंजुर केला.

अकोला: खरप येथे २५ मे रोजी घडलेल्या पिता-पुत्र हत्याकांडातील आरोपी सतिश इंगळे याची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी जामीनावर सुटका केली. सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या खरप येथे वर्कशॉपचा व्यवसाय करणाऱ्या बाप-लेकाची २५ मे रोजी रात्रीच्या सुमारास निर्घण हत्या करण्यात आली होती. हत्याकांडातील आरोपी सतीश इंगळे याची कारागृहात रवानगी करण्यात आल्यावर त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जामीनासाठी अर्ज केला होता. यावर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी आरोपी सतिश इंगळे याचा जामीन अर्ज मंजुर केला. आरोपी पक्षातर्फे ॲड. आनंद राजन देशपांडे, ॲड. प्रवीण तायडे यांनी काम पाहिले.

Web Title: Accused of double murder released on bail