शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

जादूटोणाविरोधी कायद्यानुसार सहा वर्षांमध्ये तब्बल १४ गुन्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:59 AM

सहा वर्षांमध्ये जादूटोणाविरोधी कायद्यानुसार तब्बल १४ गुन्हे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले.

ठळक मुद्देराज्यातील पहिली कारावासाची शिक्षा बार्शीटाकळी तालुक्यातील मांडोली गावातील मांत्रिकाला सुनावली.  अंनिसने तर भूत जगात नाहीच, असे सांगत, रोख बक्षीस देण्याचे आवाहन केले होते.जादूटोणाविरोधी कायद्यानुसार सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

अकोला: सहा वर्षांपूर्वी शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणाविरोधी कायदा पारित केला. या कायद्याविषयी जिल्ह्यात अंनिसने मोठी जनजागृतीच केली नाही तर बुवाबाजी, जादूटोणा करून जनतेला भीती दाखविणाºया आणि जादूटोण्याच्या भयातून मुक्तता करण्याचे आमिष दाखविणाºया मांत्रिक, महाराज, ज्योतिषांना गजाआड करण्यात मोलाची भूमिका बजावली. सहा वर्षांमध्ये जादूटोणाविरोधी कायद्यानुसार तब्बल १४ गुन्हे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले. त्यामुळे बºयाच अंशी अंधश्रद्धा विरोधात लढा देण्यास मदत झाली. २० आॅगस्ट २०१३ रोजी नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली होती या हत्येलाही सहा वर्ष पूर्ण होत आहे.सुरुवातीला जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात नव्हता. त्यामुळे फसवणुकीचे गुन्हे दाखल होत असत; परंतु त्यात अनेक त्रुटी होत्या आणि सामान्य शिक्षेची तरतूद होती. आरोपी जामिनावर सुटत. त्यानंतर २0१३ साली महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी जादूटोणाविरोधी कायदा पारित केला. या कायद्यामुळे जनतेच्या मनात असलेल्या अनेक अंधश्रद्धा, जादूटोणा, भानामती, भूतपिशाचसारख्या भ्रामक कल्पना दूर करण्यासाठी मदत झाली. अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्ह्यात सातत्याने जनजागृती करून जनतेला जागरूक करण्याचे कार्यच केले नाही तर जनतेच्या मनातील अंधश्रद्धा, जादूटोणा, मंत्रतंत्राविषयीच्या भीतीचा फायदा घेऊन त्यांच्यावर अघोरी प्रयोग करून आर्थिक लुबाडणूक करणाºया मांत्रिक, महाराज, बुवाबाजी करणारे, ज्योतिषी यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्यांना गजाआड करण्यातसुद्धा यश मिळविले. एवढेच नव्हे तर राज्यातील पहिली कारावासाची शिक्षा बार्शीटाकळी तालुक्यातील मांडोली गावातील मांत्रिकाला सुनावली. 

नरबळी, भूतपिशाच, गुप्तधनाविषयी गैरसमज!ग्रामीण भागासोबत शहरी भागातसुद्धा जादूटोणा, भूत, प्रेत, नरबळी, गुप्तधन याविषयी मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहेत आणि अंधश्रद्धांना खतपाणी घालण्याचे काम मांत्रिक, महाराज, बुवा करीत आहेत. अंनिसने तर भूत जगात नाहीच, असे सांगत, रोख बक्षीस देण्याचे आवाहन केले होते. जादूटोणा, मंत्रतंत्र या सर्व भ्रामक कल्पना आहेत. त्यामुळे जनतेने मांत्रिक, बुवा, महाराजांपासून दूर राहायला हवे.

या महाराज, मांत्रिकांचा केला भांडाफोड-शहरात एका हॉटेलमध्ये उत्तर प्रदेश येथील ओमप्रकाश जोशी नावाचा ज्योतिषी येत होता आणि वृत्तपत्रात जाहिरात देऊन ज्यांना मूलबाळ होत नाही, कोर्ट कचेरीचे काम, वशीकरण, प्रेमप्रकरण, गतिमंद आणि लकवा आदी प्रकारातून बरे करण्याचा दावा करत होता. त्याच्याविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यानुसार सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

-एका मुंज्याचा (अविवाहित तरुणाचा) बळी दिल्याने पैशांचा पाऊस पडेल यासाठी संभाजी ब्रिगेडच्या एका तरुणाला फसवणाऱ्या सुधाकर सोळंके या शिक्षकावर आणि वाशिम येथील मांत्रिकावर खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

-बाळापूर तालुक्यातील दगडखेड, बार्शीटाकळी तालुक्यातील खेट्री येथे काही घरांमध्ये भानामती करून जनतेमध्ये दहशत पसरविली होती. हा प्रकार अ.भा. अंनिसने बंद केला.

चमत्काराचा दावा करणाºया भोंदूबाबा-ज्योतिष-मांत्रिकावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. तंत्र-मंत्र, अंगात येणे, करणी, जादूटोणा सर्व थोतांड आहे. जादूटोणाविरोधी कायदा गुन्हा घडण्याअगोदरच लागू होतो. यात शिक्षा व ५0 हजार दंडाची तरतूद आहे. कोणाची फसवणूक होत असल्यास त्यांनी अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क करावा.-चंद्रकांत झटाले,महानगर संघटक, अ.भा. अंनिस

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय