अकोला- अकोट मार्गावर बसची दुचाकीस धडक, सुदैवाने वाचले तिघांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 17:52 IST2018-05-10T17:52:54+5:302018-05-10T17:52:54+5:30
वल्लभनगर : भरधाव बसने दुचाकीस धडक दिल्याची घटना अकोला ते अकोट मार्गावरल कासलसी फाट्यावर १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता घडली.

अकोला- अकोट मार्गावर बसची दुचाकीस धडक, सुदैवाने वाचले तिघांचे प्राण
वल्लभनगर : भरधाव बसने दुचाकीस धडक दिल्याची घटना अकोला ते अकोट मार्गावरल कासलसी फाट्यावर १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता घडली. बस खाली सापडल्याने दुचाकीचा चुराडा झाला. सुदैवाने त्यावर प्रवास करणारे तिघांसह बसमधील प्रवशांचे प्राण वाचले. अपघातानंतर बस रस्त्याच्या खाली उतरली होती.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजय बळीराम मोरे, अनिल गजानन घुगरे, गणेश किसन घुगरे हे दुचाकी क्र.एमएच ४०-८६३४ ने कासलीवरुन वल्लभनगरकडे जात होते. दरम्यान, कासली फाट्यावर अकोटकडे जात असलेल्या बस क्र.एमएच २८-७५४७ने दुचाकी जबर धडक दिली. दुचाकीवरील तिघेही बाहेर फेकल्या गेले. त्यांची दुचाकी बस खाली सापडल्याने तिचा चुराडा झाला. या अपघातात सुदैवाने तिघेही बचावले. त्यांना किरकोळ मार लागला. घटनेची माहिती मिळताच अकोट फैल पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. दुचाकीला धडक दिल्याने बस रस्त्याच्या खाली उतरली होती.चालकाने वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा अपघात टळला. (वार्ताहर)