एसीबीचा रिव्हर्स ट्रॅप, पोलिसाला लाच देणाऱ्या तीन जुगाऱ्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 11:19 IST2021-05-22T11:18:37+5:302021-05-22T11:19:30+5:30
अकोला जिल्ह्यातील हा दुसरा रिव्हर्स ट्रॅप असून राज्यात अशा प्रकारची कारवाई केवळ अकोला जिल्ह्यातच घडल्याचे समोर येत आहे

एसीबीचा रिव्हर्स ट्रॅप, पोलिसाला लाच देणाऱ्या तीन जुगाऱ्यांना अटक
अकोला : दहीहंडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांना जुगार अड्डा चालविण्यासाठी महिन्याला 50 हजार रुपये लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन जुगार माफियांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
अकोला जिल्ह्यातील हा दुसरा रिव्हर्स ट्रॅप असून राज्यात अशा प्रकारची कारवाई केवळ अकोला जिल्ह्यातच घडल्याचे समोर येत आहे. शिवा गोपाळराव मगर अभिजीत रविकांत पागृत व घनश्याम गजानन पागृत अशी तिन्ही आरोपींची नावे असून त्या तिघांना 25 हजार रुपयांची लाच देताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.