आंघाेळीसाठी गेलेल्या युवकाचा विहीरीत बूडून मृत्यू
By सचिन राऊत | Updated: March 26, 2024 22:25 IST2024-03-26T22:25:06+5:302024-03-26T22:25:28+5:30
शिवापूर शेतशिवारातील घटना, युवक उमरी परिसरातील रहीवासी

आंघाेळीसाठी गेलेल्या युवकाचा विहीरीत बूडून मृत्यू
अकाेला : उमरी परिसरातील हनुमान मंदिराजवळील रहीवासी शुभम राजू गीते या ३० वर्षीय युवकाचा शिवापुर शेत शिवारातील एका विहीरीतील पाण्यात बूडून मृत्यू झाल्याची घटना साेमवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी खदान पाेलिसांनी आकस्मीक मृत्यूची नाेंद केली आहे.
उमरी परिसरातील रहीवासी शुभम राजू गीते वय ३० वर्ष हा युवक शिवापूर शेत शिवारातील जयकुमार पाखरे यांच्या शेतातील विहीरमध्ये साेमवारी सायंकाळी आंघाेळीसाठी गेला हाेता. आंघाेळ करीत असतांना विहीरीतील पाण्यात बूडून शुभमचा मृत्यू झाला. या प्रकरणी शुभमचा भाउ आकाश राजू गीते रा. लहान उमरी यांनी खदान पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पाेलिसांनी आकस्मीक मृॅत्यूची नाेंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार धनंजय सायरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय पदमने करीत आहेत.