शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
2
मुलींसाठी कमालीची आहे 'ही' स्कीम! केवळ व्याजातून होणार ₹४९ लाखांची कमाई, मॅच्युरिटीवर मिळतील ₹७२ लाखांचा फंड
3
VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार
4
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
5
"मविआ फुटणार… लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात आलीये", भाजप नेत्याचा ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसवर बाण
6
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
7
VIDEO: धोनीच्या रांचीमधील आलिशन घरात जंगी पार्टी... विराट कोहली, ऋषभ पंतने लावली हजेरी
8
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
9
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
10
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
11
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
12
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
13
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
14
सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
15
गुंगीचे औषध देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; स्ट्रगलिंग मॉडेलला अटक, २ साथीदारांचा शोध सुरू
16
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
17
‘गंभीर’ बट्ट्याबोळ वेळीच आवरा! भारतीय क्रिकेटची अशी पत घालवणे जास्त भयंकर अन् अक्षम्य
18
गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
19
पोकळ बडबड करून भाजप, मोदींशी कसे लढता येईल?; कातडीबचाव आघाड्या दूर साराव्या लागतील
20
सत्तेसाठी कोण काय करेल, याचा काहीच नेम नाही; माजी राष्ट्राध्यक्षांना २७ वर्षांची शिक्षा, पण का?
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळांच्या कट्टर समर्थकाने केली आत्महत्या ! व्हाट्सअँप स्टेटस ठेऊन ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर केले गंभीर भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 16:39 IST

छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक : मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेल्या पत्रात जातीय जनगणनेचा आग्रह, पत्र व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आलेगाव (ता. अचलपूर) येथील माळी महासंघ पदाधिकारी व माजी ग्रामपंचायत सदस्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (९ ऑक्टोबर) आलेगाव बसस्थानकात घडली. विजय बोचरे (५९) असे आत्महत्या करणाऱ्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक असलेले विजय बोचरे यांनी आत्महत्येपूर्वी पहाटे २:५० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून पत्र लिहून ते व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवले. 'ओबीसींना वाऱ्यावर सोडले आहे, त्यांना प्रवाहात येऊ द्यायचे नाही. सरपंचपदासह सर्वच पदांपासून ओबीसींना दूर ठेवले जाईल,' अशी भीती त्यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.

'मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे ओबीसींचे आयुष्य धोक्यात आले आहे. जातीय जनगणना झालीच पाहिजे,' असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. बोचरे यांच्या आत्महत्येची बातमी समजताच व्यापाऱ्यांनी सर्व दुकाने बंद ठेवली. संतप्त नागरिकांनी शासनाने ओबीसी आरक्षणाबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी घटनास्थळी दाखल होऊन नातेवाइकांच्या भावना जाणून घेतल्या.

तसेच 'ओबीसी आरक्षणाचा मुद्दा शासनदरबारी गांभीर्याने मांडला जाईल,' असे सांगितले. त्यानंतरच मृतदेह अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. घटनास्थळी ठाणेदार रवींद्र लांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन पडघन, तहसीलदार राहुल वानखडे उपस्थित होते. 

नेत्यांनो, ओबीसींना वाचवा...

छगन भुजबळ, वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर, लक्ष्मण हाके, ससाणे, वाघमारे यांचा नामोल्लेख करत सर्वच ओबीसी व आरक्षणवादी नेत्यांनी आरक्षण वाचवण्यासाठी एकत्र राहून लढा कायम ठेवावा, तरच आरक्षण अबाधित राहील.आता आरक्षण संपल्यात जमा आहे. त्यामुळे ओबीसींच्या मुलाबाळांचे काही खरे नाही, असेही बोचरे यांनी पत्रात लिहिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chhagan Bhujbal Supporter Commits Suicide Over OBC Reservation Concerns

Web Summary : Vijay Bochare, a Chhagan Bhujbal supporter, died by suicide in Akola, citing OBC reservation issues. He left a note expressing fears that OBCs are being marginalized and urging leaders to protect their rights, triggering protests and demands for government action.
टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळAkolaअकोला