मद्यधुंद चालकाने थेट घरात घुसवली कार
By सचिन राऊत | Updated: November 26, 2023 16:39 IST2023-11-26T16:38:45+5:302023-11-26T16:39:02+5:30
सिंधी कॅम्पमधील ही घटना असून सुदैवाने जीवितहानी झाी नाही. मात्र भिंत व गेटचे मोठे नुकसान झाले.

मद्यधुंद चालकाने थेट घरात घुसवली कार
अकोला : खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिंधी कॅम्प परिसरातील कच्ची खोली परिसरातील एका घरात भरधाव कार घुसल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. रात्र असल्याने घरासमोर कुणीही नसल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र गेट व आवारभिंतीचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
सिंधी कॅम्पमधील कच्ची खोली परिसरातील रहिवासी ब्रम्हानंद वलेछा यांच्या घरात शनिवारी रात्री एक भरधाव कार घुसली. रात्र असल्याने घरासमोर कोणीही नव्हते. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बलेछा यांच्या घराचे गेट व आवारभिंतीचे नुकसान झाले.
दरम्यान, कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी खदान पोलिसांनी कारचालकास ताब्यात घेउन चौकशी केली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.