तारफाईल परिसरातून तलवारींचा साठा जप्त, रामदास पेठ पोलिसांची कारवाई

By सचिन राऊत | Updated: September 27, 2022 18:31 IST2022-09-27T18:30:58+5:302022-09-27T18:31:23+5:30

अकोला जिल्ह्यातील तारफाईल परिसरातून तलवारींचा साठा जप्त करण्यात आला. 

A cache of swords was seized from Tar File area of Akola district | तारफाईल परिसरातून तलवारींचा साठा जप्त, रामदास पेठ पोलिसांची कारवाई

तारफाईल परिसरातून तलवारींचा साठा जप्त, रामदास पेठ पोलिसांची कारवाई

अकोला : रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तारफाईल परिसरात एका घरात तलवारींचा साठा अवैधरित्या ठेवण्यात आल्याची माहिती रामदास पेठ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मंगळवारी सायंकाळी छापा टाकला. या घरातून चार ते पाच तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तार फैलातील रहिवासी मोहम्मद नासिर, मोहम्मद यासिम वय ५० वर्षे याच्या घरात घातक शस्त्र तलवारींचा साठा असल्याची माहिती रामदास पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांना मिळाली. 

या माहितीवरून त्यांनी पथकासह छापा टाकून मोहम्मद नासिर आणि मोहम्मद यासीन यांच्या घरातून चार तलवारी जप्त केल्या. या तलवारींविषयी माहिती विचारली असता या तलवारी बेकायदेशीर रित्या ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली. यावरून रामदास पेठ पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपाधीक्षक सुभाष दुधगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली रामदास पेठ ठाणेदार किशोर शेळके, संजय आकोटकर, शिवम दुबे, विजय सावदेकर, शाम मोहोळ, हर्षा वानखडे यांनी केली.

 

Web Title: A cache of swords was seized from Tar File area of Akola district