९६ हजारांचा गुटखा जप्त
By Admin | Updated: June 5, 2014 00:09 IST2014-06-05T00:07:38+5:302014-06-05T00:09:34+5:30
आकोट शहरात ९६ हजार रुपयाच्या हजारांचा गुटखा जप्त.

९६ हजारांचा गुटखा जप्त
आकोट : शहरात विमल पुड्यांची सर्रास विक्री सुरू असून अशा ९६ हजार रुपयाच्या विमल पुड्या बाळगणारास आकोट पोलिसांनी बुधवार ४ जून रोजी ताब्यात घेतले. अन्न सुरक्षा अधिकार्यांनी आपल्या पथकासह शहरातील याकुबपुरा परिसरात छापा मारला असता म. रियाज म. युसुफ याचेकडे १६ हजार विमल गुटखा व विमल पान मसालाच्या पुड्या आढळून आल्या.या पुड्यांची किंमत ९६ हजार रुपये आहे. अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब श्रीकृष्ण वाकडे यांचे तक्रारीवरून आकोट पोलिसांनी म. रियाज याचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.