व्यापा-याच्या कर्मचा-यांकडे साडेनऊ लाखांची रोकड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:13 IST2017-08-21T22:13:38+5:302017-08-21T22:13:38+5:30

व्यापा-याच्या कर्मचा-यांकडे साडेनऊ लाखांची रोकड!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : खामगाव येथील एका पान मसाला व्यापाºयाच्या दोन कर्मचाºयांकडून बाळापूर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ९ लाख ६० हजार रुपयांची रोकड हस्तगत केली. मध्यरात्री अकोला नाक्याजवळ गस्त घालत असताना संशयास्पद चारचाकी वाहनांच्या तपासणीत ही रक्कम सापडली.
कारमधील दोन्ही व्यक्तींकडे या रकमेबाबत चौकशी केली असता, ती रक्कम खामगाव येथील ठाकूर नावाच्या एका व्यापाºयाची असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या रकमेबाबत प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयातून माहिती घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.