शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात डीएलएडच्या ९00 जागा; प्रवेश केवळ १३८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 14:53 IST

जिल्ह्यात डीएलएड अभ्यासक्रमाच्या ९00 जागा आहेत आणि प्रवेश केवळ १३८ विद्यार्थ्यांनीच घेतले आहेत. यावरून डीएलएडच्या अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांमध्ये किती उदासीनता आहे, हे दिसून येते.

ठळक मुद्देविद्यार्थी संख्येअभावी जिल्ह्यातील सात खासगी अध्यापक विद्यालयांनी बंदचे प्रस्ताव पाठविले आहेत.डीएलएड अभ्यासक्रमासाठी स्पर्धा लागायची, त्या डीएलएड अभ्यासक्रमापासून विद्यार्थी दूर पळू लागले.

- नितीन गव्हाळे

अकोला: दहा वर्षांपूर्वी डीएड कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नव्हता, एवढी स्पर्धा होती; परंतु सद्यस्थितीत मात्र डीएलएडच्या विद्यालयांची विदारक परिस्थिती झाली आहे. विद्यार्थी संख्येअभावी डीएलएड विद्यालये बंद आहेत. जिल्ह्यात डीएलएड अभ्यासक्रमाच्या ९00 जागा आहेत आणि प्रवेश केवळ १३८ विद्यार्थ्यांनीच घेतले आहेत. यावरून डीएलएडच्या अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांमध्ये किती उदासीनता आहे, हे दिसून येते. एवढेच नाही तर विद्यार्थी संख्येअभावी जिल्ह्यातील सात खासगी अध्यापक विद्यालयांनी बंदचे प्रस्ताव पाठविले आहेत.एकेकाळी शासकीयसोबतच खासगी अध्यापक विद्यालयांचा सुवर्णकाळ होता. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल डीएड करण्याकडे होता. शिक्षकांची नोकरी मिळवायची, हे प्रत्येकाचे स्वप्न होते. त्यावेळी विज्ञान, वाणिज्य शाखेला महत्त्व न देता, हजारो विद्यार्थी डीएडला महत्त्व द्यायचे. पालकही मुलांना डीएड करण्याचा आग्रह धरायचे. त्यामुळे राज्यातच नव्हे तर जिल्ह्यातसुद्धा खासगी अध्यापक विद्यालये सुरू करण्यात आली. मोठ्या प्रमाणात डोनेशन भरून विद्यार्थी डीएड पदविका प्राप्त करू लागले; परंतु कालांतराने शिक्षक भरती बंद झाली. जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी कॉन्व्हेंटकडे वळू लागले. त्यामुळे या शाळा ओस पडू लागल्या. विद्यार्थी संख्येअभावी शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरू लागले. त्यामुळे आता शिक्षकाची नोकरी नको रे बाबा...असा सूर ऐकायला येऊ लागला. बंद झालेली शिक्षक भरती, शिक्षकांच्या मागे लागलेली अशैक्षणिक कामे, यामुळे विद्यार्थ्यांनी डीएलएड विद्यालयांकडे पाठ फिरविली. ज्या डीएलएड अभ्यासक्रमासाठी स्पर्धा लागायची, त्या डीएलएड अभ्यासक्रमापासून विद्यार्थी दूर पळू लागले. एकंदरीत शासकीय आणि खासगी अध्यापक विद्यालयांना अवकळा प्राप्त झाली आहे. ही विद्यालये ओस पडली आहेत. अनुदानित अध्यापक विद्यालयांना टाळे लागण्याची वेळ आली आहे. शिक्षक भरती सुरू झाली तरच पुन्हा अध्यापक विद्यालयांना चांगले दिवस येतील, असे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले.

दोनदा मुदतवाढमहाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे ४ जूनपासून डीएलएडच्या प्रथम वर्षासाठी आॅनलाइन शासकीय कोट्यातून अर्ज मागविले आहेत. प्रवेशासाठी २0 जून अंतिम मुदत होती, ती ३0 जूनपर्यंत वाढविण्यात आली. यानंतरही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने ही मुदत ७ जुलैपर्यंत वाढविण्यात आली.

डीएलएडच्या जागा भरपूर आहेत; परंतु विद्यार्थी संख्येअभावी शेकडो जागा रिक्त आहेत. केवळ आतापर्यंत १३८ विद्यार्थ्यांनी डीएलएडला प्रवेश घेतला आहे. ७ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज करण्यासाठी संधी विद्यार्थ्यांना आहे.डॉ. प्रकाश जाधव, प्राचार्य, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था

 

टॅग्स :Akolaअकोलाeducationशैक्षणिक