८५0 गावांत पाणीटंचाई निवारणाची कामे पूर्ण!

By Admin | Updated: July 25, 2016 01:58 IST2016-07-25T01:58:02+5:302016-07-25T01:58:02+5:30

अकोला जिल्ह्यातील ९५ गावांमध्ये १0 कोटींची कामे सुरु; ८६५ कामांवर झाला ११ कोटी खर्च.

850 villages complete water shortage work | ८५0 गावांत पाणीटंचाई निवारणाची कामे पूर्ण!

८५0 गावांत पाणीटंचाई निवारणाची कामे पूर्ण!

संतोष येलकर/ अकोला
जिल्हय़ातील पाणीटंचाई निवारणासाठी गत २१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ८५0 गावांमध्ये विविध उपाययोजनांची ८६५ कामे पूर्ण करण्यात आली असून, या कामांवर ११ कोटी ६ लाख ३८ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला, तसेच जिल्ह्यातील ९५ गावांमध्ये १0 कोटी ५२ लाख ६६ हजार रुपये खर्चाची १२ उपाययोजनांची कामे सध्या सुरू आहेत.
गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. नदी-नाले आटले होते.
त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये विविध १ हजार १ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ९0६ गावांमध्ये २३ कोटी ५३ लाख २५ हजार रुपये खर्चाच्या ९८६ उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या कामांपैकी २१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ८५0 गावांमध्ये ८६५ पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, या कामांवर ११ कोटी ६ लाख ३८ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला.
पाणीटंचाई निवारणाच्या कामांना शासनामार्फत ३१ जुलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील ९५ गावांमध्ये १0 कोटी ५२ लाख ६६ हजार रुपये खर्चाची विविध १२ उपाययोजनांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.

Web Title: 850 villages complete water shortage work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.