अपघात मृत्यू प्रकरणात ८३ लाखाची नुकसान भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 18:05 IST2020-01-06T18:04:40+5:302020-01-06T18:05:44+5:30
सदरचा दावा दोन्ही पक्षाच्या अनुमतीने निकाली काढताना जिल्हा व सत्र न्यायाधीश मेनजोगे यांनी ८३ लाख नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.

अपघात मृत्यू प्रकरणात ८३ लाखाची नुकसान भरपाई
अकोला : अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या परिवारास ८३ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, असा महत्वपूर्ण निकाल वाशिम लोक न्यायालयाने दिला आहे, टाटा एआयजी इन्शुरन्स कंपनीला हा फटका बसला आहे.
मालेगाव येथील रहिवाशी प्रा अनिल वाढे हे नागपूर जिल्ह्यातील जामगडच्या बाबू गुणवंतराव विद्यालयात कार्यरत होते. १ मे २०१८ रोजी प्रा. वाढे कारने जात असताना मालेगाव मेहकर मार्गावरील मुंगळा फाटा येथे लोखंडी गजाने भरलेल्या ट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबल्यामूळे भरधाव कार ही ट्रकवर आदळली होती यामध्ये अनिल वाढे यांचा जागीच मृत्यू झाला होता. मालेगाव पोलिसांनी या प्रकरणी ट्रक चालक सिरजोद्धिन वजीर उद्दीन याला अटक केली होती. मृतकाची पत्नी स्वाती वाढे यांनी अँड नरेंद्र बेलसरे, व अँड सोमाणी यांच्यावतीने एआयजी इन्शुरन्स कंपनीवर १ कोटीचा नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे हा अपघात घडला, तसेच मृतक व्यक्ती घरातील कुटुंब प्रमुख होता, उचशिक्षित होता, ट्रक चालकाच्या चुकीमुळे प्रा वाढे यांना जीव गमवावा लागला, असा युक्तिवाद दावाकर्तीच्या वकिलांनी न्यायालयात केला. सदरचा दावा दोन्ही पक्षाच्या अनुमतीने निकाली काढताना जिल्हा व सत्र न्यायाधीश मेनजोगे यांनी ८३ लाख नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. अपघाताच्या वेळी दावाकर्ती ही गरोदर होती, नंतर मुलाचा (अर्नव) जन्म झाला, अर्णवला सुध्दा न्यायालयाने ३० लाख रुपये मंजूर केले तर मृतकाचे आईवडिलांना प्रत्येकी दहा- दहा लाख तसेच पत्नीला ३३ लाख रुपये देण्याचे सांगितले. दावाकर्त्याच्यावतीने अँड नरेंद्र बेलसरे, अँड सोमाणी यांनी बाजू मांड