शालार्थ प्रणालीमध्ये ७७ नवीन शिक्षकांची नावे समाविष्ट होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 18:38 IST2019-06-16T18:38:45+5:302019-06-16T18:38:51+5:30

जिल्ह्यातील ७७ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट होणार आहेत.

77 new teachers' names will be included in the Shalarth system! | शालार्थ प्रणालीमध्ये ७७ नवीन शिक्षकांची नावे समाविष्ट होणार!

शालार्थ प्रणालीमध्ये ७७ नवीन शिक्षकांची नावे समाविष्ट होणार!

अकोला: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संचालकांच्या आदेशानुसार शालार्थ प्रणालीमध्ये नवीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे समाविष्ट करण्यासाठी मंजुरी दिली आहे. अशा जिल्ह्यातील ७७ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट होणार असून, ही नावे शिक्षण उपसंचालक स्तरावर समाविष्ट करण्यासाठी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक अधीक्षक कार्यालयाने पाठविली आहेत.
अनुदानित खासगी माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, अध्यापक विद्यालय, सैनिकी शाळा, नगर परिषद शाळांमधील ज्या नवीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालकांनी शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी मान्यता दिली आहे आणि त्यांचे या कार्यालयामार्फत वेतन काढण्यात ते. त्यामुळे त्या सर्व शिक्षकांची शाळांकडून शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठीचे शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालकांचे पत्र, वैयक्तिक मान्यता, प्रथम नियुक्ती पत्र, आधार कार्ड आदी माहिती वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक अधीक्षक कार्यालयाने मागविली होती. त्यानुसार जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या ३५ शिक्षकांची आणि हायस्कूलच्या ४२ अशा एकूण ७७ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्राप्त झाली होती. ही प्राप्त झालेली ७७ शिक्षकांची यादी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक अधीक्षक कार्यालयाने शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहेत. शिक्षण संचालकांकडून परवानगी मिळाल्यानंतर या सर्व नवीन ७७ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात येतील. (प्रतिनिधी)

 

Web Title: 77 new teachers' names will be included in the Shalarth system!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.