‘भारिप’चे ६१ उमेदवार निश्चित !
By Admin | Updated: January 28, 2017 01:52 IST2017-01-28T01:52:04+5:302017-01-28T01:52:04+5:30
आंबेडकरांनी दिली यादीला मान्यता; सोमवारी होणार नावे जाहीर?

‘भारिप’चे ६१ उमेदवार निश्चित !
अकोला, दि. २७- भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी मान्यता दिल्यानंतर, अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी भारिप-बमसंच्या ६१ उमेदवारांची यादी शुक्रवारी रात्री निश्चित करण्यात आली. निश्चित करण्यात आलेल्या पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची यादी सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
अकोला महानगरपालिका निवडणुकीत सर्व जागा स्वबळावर लढण्याची तयारी भारिप-बमसंने सुरू केली आहे.
त्यासाठी शहरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून प्राप्त झालेल्या इच्छुक उमेदवारांच्या नावांमधून प्रभागनिहाय उमेदवार भारिप-बमसं निवडणूक निरीक्षक उपसमितीकडून निश्चित करण्यात येत आहे. उपसमितीकडून तयार करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीवर पक्षाचे राष्ट्रीय अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी रात्री उपसमिती प्रमुख बालमुकुंद भिरड यांच्यासह समिती सदस्यांसोबत 'ऑनलाइन' चर्चा केली.
प्रभागनिहाय उमेदवारांची माहिती घेतल्यानंतर ६१ उमेदवारांच्या यादीला अँड. आंबेडकर यांनी मान्यता दिली. त्यांच्या मान्यतेनंतर पक्षाचे ६१ उमेदवार निश्चित करण्यात आले. त्यामध्ये मुस्लीम, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि सर्वसाधारण उमेदवारांचा समावेश असून, निश्चित करण्यात आलेल्या उमेदवारांच्या नावांची यादी पक्षामार्फत सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.