शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

अकोला जिल्ह्यात ५ हजार ५४७ जलमित्र करणार महाराष्ट्रदिनी महाश्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 14:01 IST

जिल्ह्यात १ मे रोजी श्रमदान करण्यासाठी चार तालुक्यांमधून ५ हजार ५४७ जलमित्रांनी नोंदणी केली आहे.

ठळक मुद्दे अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यांत वॉटर कप स्पर्धेंतर्गत श्रमदान करण्यात येत आहे. चारही तालुक्यांत ५ हजार ५४७ जलमित्रांनी श्रमदानासाठी आॅनलाइन नोंदणी केली आहे. तेल्हारा तालुक्यात विदर्भातून सर्वाधिक जलमित्रांची नोंदणी झाली आहे.

अकोला : दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी जिल्हाभरात जलसंधारणाच्या कामासाठी श्रमदानाचे तुफान आले आहे. या तुफानाचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रदिनी राज्यभर महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात १ मे रोजी श्रमदान करण्यासाठी चार तालुक्यांमधून ५ हजार ५४७ जलमित्रांनी नोंदणी केली आहे. तेल्हारा तालुक्यात विदर्भातून सर्वाधिक जलमित्रांची नोंदणी झाली आहे.पाणी फाउंडशेनच्या माध्यमातून जलसंधारणाची चळवळ सध्या जिल्ह्यात सुरू आहे. अभिनेता आमिर खान यांनी खंडाळा गावात भेट दिल्याने श्रमदान करणाऱ्या युवकांमध्ये उत्साह वाढला आहे. १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभर महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जलमित्रांची आॅनलाइन नोंदणी करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यांत वॉटर कप स्पर्धेंतर्गत श्रमदान करण्यात येत आहे. या चारही तालुक्यांत ५ हजार ५४७ जलमित्रांनी श्रमदानासाठी आॅनलाइन नोंदणी केली आहे.शहरातील लोकांना ग्रामीण परिस्थितीची जाणीव व्हावी, तसेच आपण पित असलेले पाणी हे कोण्यातरी धरणाचे आहे. त्यावर शेतकºयांचा अधिकार आहे. ते पाणी सिंचनासाठी आहे. मात्र, आपण ते पिण्यासाठी वापरतो. त्यामुळे त्याचा ऋणातून उतराई होण्यासाठी खºया अर्थाने गावाकडे जाऊन आपण श्रमदान केले पाहिजे. सरकारी कर्मचारी, युवक, विद्यार्थी, महिला यांनी महाश्रमदानात सहभाग घेतला पाहिजे. ते काळाची गरज आहे, असे आवाहन आमिर खान यांनी केले आहे.अशी झाली जलमित्रांची नोंदणीतेल्हारा- ४४६१अकोट- ४०७पातूर- ३९५बार्शीटाकळी- २८४या गावात होणार महाश्रमदानतालुका        गावतेल्हारा -     चितलवाडी, गाडेगावअकोट-        शहापूरबार्शीटाकळी - कान्हेरी सरपपातूर-           चतारीअकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी, पातूर या चारही तालुक्यांत महाश्रमदान होणार आहे. यासाठी राज्यातून दूरवरून आॅनलाइन नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. शहरातील लोकांनीदेखील गावाकडे जाऊन दोन हात व दोन तास महाश्रमदानात द्यावे व गावाकडील लोकांचा उत्साह वाढवावा. तुमचे दोन तास व दोन हात दुष्काळ निवारण्यासाठी आवश्यक आहेत.- नरेंद्र सुभाष काकड, जिल्हा समन्वयक पाणी फाउंडेशन, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाTelharaतेल्हाराAamir Khanआमिर खान