अकोट, दि. १४- अकोट-अकोला मार्गावरील पेट्रोल पंपावर काम करीत असलेल्या नोकराने ४७ हजार ४३५ रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना १0 मार्च रोजी उघडकीस आली. अकोट शहर पोलिसात छाया मधुसूदन अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीत आरोपी प्रमोद देवराव रायबोले रा. तांदूळवाडी हा पेट्रोल पंपावर काम करीत होता. या दरम्यान त्याने पेट्रोल पंपावरील ४७ हजार ४३५ रुपये रोख रक्कम लंपास केली. आरोपी प्रमोद रायबोलेविरुद्ध भादंवि ३८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेट्रोल पंपावरून ४७ हजार रुपये लंपास
By admin | Updated: March 15, 2017 02:40 IST