गिरडा जंगलात ४० कुत्रे मृतावस्थेत आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 13:09 IST2019-09-06T13:01:37+5:302019-09-06T13:09:38+5:30
बुलडाणा : तालुक्यातील गिरडा - हनवतखेड रस्त्याच्या बाजूला जवळपास ४० कुत्रे मृतावस्थेत आढळल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे ...

गिरडा जंगलात ४० कुत्रे मृतावस्थेत आढळले
बुलडाणा : तालुक्यातील गिरडा - हनवतखेड रस्त्याच्या बाजूला जवळपास ४० कुत्रे मृतावस्थेत आढळल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गिरडा ते हनवतखेड रस्त्याच्या बाजूला अज्ञातांनी रात्री ३० ते ४० कुत्रे आणून टाकले. सकाळी शेतात जाणाºया शेतकºयांना याबाबत माहिती मिळाली. तत्काळ वनविभागाच्या कर्मचाºयांना कळविण्यात आले. गिरडा बीटचे वनरक्षक कैलास तराळ, पी. एम. नारखेडे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. यावेळी सरपंच भारत भिसे, पोलीस पाटील गजानन चांडाळकर, योगेश गायकवाड, राजू गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ हजर होते. कुत्रे नेमके कुणी आणून टाकले याबाबत तपास सुरु आहे.