शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

मृत्यूच्या दारातून परतले ४ हजार ९४५ संक्रमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 9:25 PM

आरोग्य यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न, अद्ययावत उपचार अन् रुग्णांची सकारात्मक वृत्ती यामुळे हे साध्य झाले आहे.

 अकोला : कोरोना संसर्गाच्या काळात मंदिरे अद्यापही ‘लॉकडाऊन’ आहेत; मात्र डॉक्टरांच्या रूपातील देवदूत रुग्णांची काळजी घेत असल्याची प्रचिती येत आहे. साडेपाच महिन्यांच्या काळात ४ हजार ९४५ कोरोनाग्रस्तांना मृत्यूच्या दारातून डॉक्टरांनी परत आणले आहे. आरोग्य यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न, अद्ययावत उपचार अन् रुग्णांची सकारात्मक वृत्ती यामुळे हे साध्य झाले आहे.जिल्ह्यात ७ एप्रिल रोजी पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाली, त्यानंतर कोरोनाचा विळखा हळूहळू घट्ट होऊ लागला. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे रुग्ण बरेही होऊ लागले. या रुग्णांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांच्या डिस्चार्जच्या वेळी पालकमंत्र्यांसह, जिल्हाधिकारी व इतर वैद्यकीय अधिकारीही उपस्थित राहिले. केवळ रुग्णांचाच नव्हे, तर जीव धोक्यात घालून त्यांच्यावर उपचार करणाºया डॉक्टर व सर्व आरोग्य पथकाचा उत्साह वाढविण्यासाठी सर्व अधिकाºयांनी टाळ्या वाजवून स्वागत करत होते; मात्र जसजसे कोरोनाचे रुग्ण वाढत गेले तसतसा आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ लागला. अनेक डॉक्टरच कोरोनाच्या विळख्यात सापडले; मात्र आरोग्य यंत्रणेने सातत्य ठेवत रुग्णांची सेवा सुरूच ठेवली. परिणामी, गेल्या साडेपाच महिन्यात तब्बल४ हजार ९४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

कोरोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा बाधितांचे प्रमाण वाढलेअकोल्यात वाढत्या कोरोना संक्रमणाने जिल्ह्यातील नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. गेल्या पंधरवड्यापासून कोरोनामुक्त रुग्णांपेक्षा कोरोनाबाधित होणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे कोरोनाचे संकट अधिक गडद होत असल्याचे चित्र आहे.  वारी १५५ रुग्णांना कोरोनामुक्त घोषित करण्यात आले तर,  76 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. अशीच स्थिती गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे बरे होण्याची टक्केवारी घसरलीसध्या अकोला जिल्ह्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ७२.४३ टक्के झाले आहे. आॅगस्टच्या शेवटपर्यंत हे प्रमाण ८० टक्क्यांच्या घरात पोहोचले होते; परंतु त्यानंतर कोरोना संक्रमण वेगात वाढले व त्यासोबत रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण कमी झाले होते. सप्टेंबरमध्ये कोरोनाबाधितांची टक्केवारी पुन्हा वाढल्यामुळे बरे होणाºया रुग्णांच्या टक्केवारीत घट झाली आहे. आरोग्य यंत्रणेचे सातत्यकोरोना संसर्गासह विविध गंभीर आजार असणाºया रुग्णांना डॉक्टरांनी मृत्यूच्या दाढेतून परत आणले आहे. सर्वोपचार रुग्णालयाची वैद्यकीय चमू तसेच कोविड रुग्णालयात डॉक्टरांसह सहकाºयांची चमू कुटुंबापासून महिनाभर दूर राहून, आरोग्यसेवेचे महत्कार्य करीत आहेत. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न, रुग्णांचा सकारात्मक प्रतिसाद, अद्ययावत उपचारपद्धती यामुळे गंभीर रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे.

या आजारांच्या रुग्णांना संसर्गकॉमर्बिड आजाराच्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यांच्या प्रकृतीमध्ये गुंतागुंत तयार होते व हा प्रकार कोरोनामध्ये असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कोविड रुग्णालयात दाखल गंभीर रुग्णांना मधुमेह, हायपरटेंशन, हृदयविकार, कर्करोग, किडनीचे विविध आजार, यकृताचे आजार, मूळव्याध, अर्धांगवायू हे आजार असल्याने या रुग्णांवर उपचार करताना अधीक दक्ष व सजग राहावे लागत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला