न्याय हक्कासाठी ३५ वर्षांचा संघर्ष

By Admin | Updated: May 12, 2014 00:05 IST2014-05-11T23:50:28+5:302014-05-12T00:05:44+5:30

परिचारीकांना आपल्या हक्कासाठी ३५ वर्षापासून संघर्ष

35 years of struggle for justice | न्याय हक्कासाठी ३५ वर्षांचा संघर्ष

न्याय हक्कासाठी ३५ वर्षांचा संघर्ष

बुलडाणा : रुग्णसेवा हीच खरी ईश्‍वर सेवा असे म्हटले जाते. अशा रुग्णसेवेशी निगडीत असलेल्या वैद्यकिय क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात बदत होत आहे. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना डॉक्टारांचा जेवढा आधार वाटतो तेवढाच आधार रुग्णालयाती परिचारीकेचा ही वाटत असतो. मात्र आरोग्य सेवेचे वसा घेलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील परिचारीकांना आपल्या हक्कासाठी ३५ वर्षापासून संघर्ष करावा लागत आहे. जिल्ह्यात आज बहुतेक सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. फिरते दवाखाने तसेच क्षयरोगी व कुष्ठरोगी, प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु आहे. शिवाय रुग्णांसाठी विशेष योजना आखण्यात आल्या आहेत. एक आव्हानात्मक क्षेत्र म्हणून नर्सींगच्या क्षेत्रात जिल्हाभरातून साडेतिन हजार परिचारीका आपल्या हक्कासाठी लढाई अविरत लढतच आहे. आरोग्य प्रशासनाच्या आडमुठय़ा धोरणामुळे त्याचा आवाज शासनापर्यत पोहचविल्या जात नाही. १९७८ साली जिल्ह्यात एकूण १३ रुग्णालये व ९६ दवाखाने निर्माण झाली. याच वेळी परिचारीकांसाठी काम करणार्‍या महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन या संघटनेची पाळेमुळे जिल्ह्यात रोहल्या गेली. यावेळी २३४ परिचारिका जिल्ह्यात आरोग्य सेवेतून काम करीत होत्या. काम करण्यात येणार्‍या अडचणींना वाचा फोडण्यासाठी त्या संघटनेत सहभागी झाल्या आणि आपल्या हक्काची लढाईला सुरुवात केली. आज जिल्ह्याभरात साडतीन हजार परिचारीका आपल्या हक्कासाठी लढा देत आहेत.

** समस्या जैसे थे

परिचारिकांची करार पद्धतीच्या नेमणूका होता. त्यांना ग्रेड पे, प्रिरिव्हाईड पे मिळायला नाही, रुग्णसेवा करतांना आवश्यक सुरक्षा आणि सेवासुविधा पुरविल्या जात नाही. कामाच्या स्वरुपानुसार आर्थिक तरतूदी नाही. कायमस्वरुपी पेन्शन देण्यात आली नाही. महिला परिचारिकांना रात्रीच्यावेळी असुरक्षा आहे. कार्यालयानी भ्रष्टाचाराला बळी पडतात.अधिसेविका, परिसेविका, अधिपरिचारीका व चतुर्थश्रेणी कर्मचार्‍याची पदे अद्यापही रिक्त आहे. केंद्राप्रमाणे भत्ते नाही. या मागण्यासाठी आतापर्यत स्थानिक आणि राज्यपातळीवर ३९ आंदोलन उभारण्यात आली. मात्र यानंतरही समस्या जैसे थे आहे.

** कौतुक झालेच नाही..

रुग्णसेवेचे व्रत घेतलेल्या बुलडाणा येथील निशा सुरेन केम्बल या परिचारीकेचा राज्यशासने २00७ मध्ये राज्यस्तरी पुरस्कार देवून गौरव केला होता. त्यानंतर मात्र परिचारीकेच्या रुग्णसेवेचे कौतून कोणीही केले नाही. उत्कृष्ठ परिचारीक पुरस्कारासाठी पाच वर्षापासून जिल्हास्तरीय समिती काम पाहते आहे. यात आरोग्य, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मंडळीची भलीमोठी फौज आहे. मात्र ही मंडळी एकही पुरस्कार जिल्ह्याला मिळवून देवून शकले नाही. अशी खंत परिचारीक व्यक्त करतांना दिसतात.

** मागण्यासाठी १७0 निवेदन

जिल्ह्यातील परिचारीकेच्या विविध मागण्यांबाबत महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन, पुणे संघटनेच्या वतीने ३९ आंदोलन उभारण्यात आली. तर १७0 निवेदन शासन दरबारी सादर झाली. याही पुढे विविध आंदोलनातून परिचारीकांची हक्काची लढाई सुरु आहे. मात्र शासनाला आणि आरोग्य विभागाला मात्र अद्यापही परिचारीकांच्या समस्याबाबत जाग आली नाही.

Web Title: 35 years of struggle for justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.