शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

७० कोटींच्या थकीत कर वसुलीसाठी मनपाचे ३५ पथक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 10:48 IST

अकोला: अकोलेकरांवर थकीत असलेल्या ७० कोटींच्या थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेने ३५ पथकांचे गठन केले असून, हे पथक शनिवारपासून कार्यान्वित होत आहे.

अकोला: अकोलेकरांवर थकीत असलेल्या ७० कोटींच्या थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेने ३५ पथकांचे गठन केले असून, हे पथक शनिवारपासून कार्यान्वित होत आहे. महापालिकेतील इतर विभागातील १०५ कर्मचाºयांना या पथकांत सहभागी करण्यात आले आहे. नव्याने गठित झालेले ३५ पथक शनिवारपासून करवसुलीसाठी प्रत्यक्ष थकीतदार असलेल्या घरमालकांना भेटणार आहे. मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या पुढाकारात सुरू झालेल्या या प्रयोगास किती प्रतिसाद मिळतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.अकोला महापालिका प्रशासनापुढे मार्च अखेरपर्यंत ७० कोटी वसुलीचे उद्दिष्ट आहे. १०३ कोटींच्या थकीत वसुलीपैकी केवळ ३० कोटी रुपये वसूल करण्यात मनपा प्रशासनाला यश आले. आता महापालिका प्रशासनाला ७० कोटीं रुपयांचा कर मार्च अखेरपर्यंत वसूल करायचा आहे. अवघ्या ५० दिवसांच्या आत एवढी रक्कम वसूल करणे अशक्य दिसत असल्याने आता मनपा आयुक्त यांनी मनपातील इतर विविध विभागातील १०५ कर्मचाºयांना या मोहिमेवर घेतले आहे. शुक्रवारी या १०५ कर्मचाºयांना त्यांच्यावरील जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. प्रत्येकी तीन कर्मचाºयांचे एक पथक घरोघरी जाऊन वसुली करणार आहे. प्रत्येक पथकाकडे शंभर थकीदरांची यादी देण्यात आली आहे. शनिवारपासून चारही झोन अंतर्गत हे पथक कार्यान्वित होत आहे. कर वसुलीच्या कार्यात असलेल्या कर्मचाºयांना त्यांचे दैनंदिन कामकाज सांभाळून कर वसुलीचे काम पाहायचे आहे. शनिवारीपासून कार्यान्वित होणाºया पथकाकडून काय प्रतिसाद मिळतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. ३१ मार्च २०१९ पर्यंत जर कर वसुली झाली नाही तर पगारवाढीवर टाच बसविण्याचा इशारा आधीच मनपा आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे या करवाढीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

  वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न मनपाचे अधिकारी-कर्मचारी करीत आहे. मनपा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत झालेल्या ३५ पथकांकडून खूप अपेक्षा आहे. ३१ मार्च आधी अनेक प्रयोग केले जाणार आहेत.-विजय पारतवार, कर अधीक्षक, मनपा, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाTaxकर