अकोल्यात रविवारी ३४१ कोरोना पॉझिटिव्ह, ३० वर्षीय युवकासह दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 07:27 PM2021-03-07T19:27:12+5:302021-03-07T19:27:33+5:30

CoronaVirus News रविवार, ७ मार्च रोजी ३० वर्षीय युवकासह दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३८५ झाली आहे.

341 corona positive, 2 death in Akola | अकोल्यात रविवारी ३४१ कोरोना पॉझिटिव्ह, ३० वर्षीय युवकासह दोघांचा मृत्यू

अकोल्यात रविवारी ३४१ कोरोना पॉझिटिव्ह, ३० वर्षीय युवकासह दोघांचा मृत्यू

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, रविवार, ७ मार्च रोजी सांगळुद येथील ३० वर्षीय युवकासह दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३८५ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २७१, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ६९ अशा एकूण ३४० पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १९,१२० वर पोहोचली आहे. सद्यस्थितीत ४,७७९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. एकूण ९२ जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १४७२ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी १९६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १२७६ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मुर्तिजापूर येथील ४२, अकोट येथील २८, तेल्हारा येथील १३, कौलखेड येथील ११, मोठी उमरी येथील सहा, डाबकी रोड, खडकी, मलकापूर येथील प्रत्येकी पाच, जठारपेठ येथील चार, रनणपिसे नगर, रजपूतपुरा, सिंधी कॅम्प, जीएमसी, केशव नगर व कान्हेरी गवळी येथील प्रत्येकी तीन, रतनलाल प्लॉट, शिवसेना वसाहत, लहान उमरी, खदान, रामदास पेठ, सेलार फैल, टेलीकॉम नगर, तुकाराम हॉस्पीटल जवळ, जवाहर नगर, हरीहर पेठ व विद्यानगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित निंभोरा, मित्रा नगर, शिवनी, पोळा चौक, हिमायु रोड, सुधीर कॉलनी, सहकार नगर, किर्ती नगर, न्यु तापडीया नगर, कलेक्टर ऑफिस, अनिकेत, हिंगणारोड, तोष्णीवाल लेआऊट, खोलेश्वर, अंबीका नगर, प्रबोधन नगर, सूर्या गार्डन, वर्धमान नगर, विठ्ठल नगर, सिव्हील लाईन, मुझफर नगर, चौरे प्लॉट, खिरपुरी, भारती प्लॉट, निमकर्दा, उमरी, तारफैल, केळकर हॉस्पीटल, सिटी कोतवाली, श्रध्दा कॉलनी, स्टेट बँक कॉलनी, दोनद खु., कोठीर वाटीका, जीएमसी हॉस्टेल, बाळापूर, सांगवी बाजार व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी मोठी उमरी येथील नऊ, बोरगाव मंजू व तेल्हारा येथील प्रत्येकी सात, अंबाशी ता.पातूर व सुकोडा येथील प्रत्येकी चार, राधाकिसन प्लॉट, कुटासा, सुकोडा, गोरक्षण रोड, वाशिंबा व सांगळूद येथील प्रत्येकी दोन, तर शास्त्री नगर, अंत्री, भारती नगर, हाता, तरोडा शेगाव, बाळापूर, सातव चौक, हनुमान वस्ती, रणपिसे नगर, उमरी, कवर नगर, आदर्श कॉलनी, पंचशील नगर, दानोरी, वरुर जऊळका, जांभा बु., हिरपूर, बापोरी, रवीनगर, पारसकर शोरुम, गांधीग्राम, पाचमोरी, मिर्झापूर, शिवर, वनी रंभापूर, मलकापूर, जीएमसी, देशमुख फैल, पोळा चौक, सिव्हील लाईन, गड्डम प्लॉट व बाळापूर प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

 

३० वर्षीय युवकासह दोघांचा मृत्यू

कोरोनवर उपचार सुरु असलेल्या वानखडे नगर, अकोला येथील ६१ वर्षीय महिला रुग्णाचा रविवारी मृत्यू झाला. त्यांना ४ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. सायंकाळी सांगळुद येथील ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. त्यांना ३ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.

९२ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २७, हेंडज कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथील १०, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, ओझोन हॉस्पीटल येथील १०, आयकॉन हॉस्पीटल येथील नऊ, हॉटेल रिजेन्सी येथील चार, हॉटेल स्कायलार्क येथून सहा, युनिक हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील दोन, अवघाते हॉस्पीटल येथून सहा, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून पाच, नवजीवन हॉस्पीटल येथून चार, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील चार,अशा एकूण ९२ जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.

 

४,७७९ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १९,१२० जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १३,९५६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३८५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४,७७९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: 341 corona positive, 2 death in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.