दिवसभरात ३२ पॉझिटिव्ह, ७५ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 17:56 IST2020-11-23T17:56:23+5:302020-11-23T17:56:30+5:30
Akola CoronaVirus News आणखी ३२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९,०६१ झाली आहे.

दिवसभरात ३२ पॉझिटिव्ह, ७५ कोरोनामुक्त
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून, सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ३२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९,०६१ झाली आहे. दरम्यान आणखी ७५ जणांनी कोरोनावर मात केली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १०६४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १०३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये तेल्हारा येथील तीन, पातूर व जीएमसी येथील प्रत्येकी दोन, अंधारसांवगी ता. पातूर, शिर्ला ता. पातूर, आळसी प्लॉट, स्कूल आॅफ स्कॉलर्स, पारस, शिवनी, उमरदरी ता. बार्शिटाकळी, लखमापूर ता. बार्शिटाकळी, डाबकी रोड, जीएमसी क्वॉटर व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये समता कॉलनी येथील चार, गोरक्षण रोड व कॉग्रेस नगर येथील प्रत्येकी दोन, जठारपेठ, संतोष नगर, तापडीया नगर, कमाल नगर, रामदास पेठ व अकोट येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
७५ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून दोन, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले ७१ अशा एकूण ७५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
४६८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९,०६१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८३०५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४६८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.