शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
2
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
3
Top Marathi News LIVE Updates: अंबरनाथमध्ये मुख्य जलवाहिनीला मोठी गळती; लादी नाका परिसरात लाखो लीटर पाणी वाया
4
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
5
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
6
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
7
मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 
8
IPL 2026 Playoffs Race : RCB सह GT चं तिकीट 'कन्फर्म'; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस
9
इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?
10
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
11
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
12
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
13
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
14
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
15
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
16
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
17
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
18
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
19
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

२६ कोटीचे नियोजन; आता प्रशासनाची तिसरी यादी

By admin | Updated: May 13, 2014 01:06 IST

२६ कोटींच्या अनुदानातून सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध करून देण्याचा अकोला महापालिकेचा मानस

अकोला: शहरात मूलभूत विकास कामांसाठी शासनाकडून प्राप्त २६ कोटींच्या अनुदानातून सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा मानस आहे. त्यानुषंगाने प्रशासनाने विकास कामांची यादी तयार करण्याचे काम हाती घेतले असून, ही यादी मंजुरीसाठी सभागृहात मांडल्या जाईल. यापूर्वी महापौर व उपमहापौरांनी तयार केलेल्या ६५0 प्रस्तावांच्या यादीनंतर प्रशासनाकडून तिसरी यादी तयार होत असल्यामुळे यावर विकासाच्या मुद्यापेक्षा राजकारण जास्त होण्याची चिन्हं तूर्तास दिसत आहेत. महापालिका हद्दीत मूलभूत सोई-सुविधा निर्माण करण्यासाठी राज्याच्या नगर विकास विभागाने २0 मार्च २0१३ रोजी अकोला मनपासाठी ८ कोटी तसेच ६ एप्रिल रोजी २0 कोटी असे एकूण २८ कोटी अनुदान मंजूर केले. या निधीतून नागरिकांच्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन सर्वसमावेशक विकास कामे अपेक्षित आहेत. यापूर्वी सत्तापक्षाने २८ कोटींच्या अनुदानातून २ कोटी रुपये घनकचरा व्यवस्थापन करणार्‍या कंत्राटदाराला देण्याचा ठराव मंजूर केला होता. उर्वरित २६ कोटींचे नियोजन करताना त्यामध्ये सर्वसमावेशक विकास कामांचा अंतर्भाव अपेक्षित होता; परंतु तसे न करता सत्तापक्षाने स्वमर्जीने निधी वाटपाचा निर्णय घेत प्रस्ताव तयार केले. यामध्ये विरोधी पक्ष भाजपमधील नगरसेवकांच्या वाटेला केवळ ५ लाखांची कामे देण्याच्या मुद्यावरून प्रचंड कल्लोळ निर्माण झाला होता. विशेष म्हणजे निधी वाटपाच्या मुद्यावर खुद्द सत्तापक्षातच दुफळी निर्माण झाली. त्यामधूनच महापौर ज्योत्स्ना गवई व उपमहापौर रफिक सिद्दीकी यांनी स्वत:च्या दोन वेगवेगळ्य़ा याद्या तयार केल्या. दोन्ही याद्यांमिळून सुमारे ६५0 प्रस्ताव असल्याची माहिती आहे. यापैकी एकाही यादीला आजवर सभागृहाची मंजुरी मिळाली नाही, हे येथे उल्लेखनीय. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच २६ कोटींच्या विकास कामांच्या यादीला सभागृहात सादर केल्या जाईल. या निधीतून विकास कामेच होतील, असे तूर्तास दिसत असले तरी सत्तापक्षाने तयार केलेल्या याद्यांमध्ये एकाच कामांचा दोनदा समावेश असल्याची माहिती आहे. यामुळे निधी कमी अन् कामे जास्त,अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ही तफावत टाळण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सत्तापक्षाच्या दोन्ही याद्यांचे विस्तृत वर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामधूनच तिसरी यादी तयार करून ती मंजुरीसाठी सभागृहापुढे मांडल्या जाईल.