शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

कवठा बॅरेजची २०० फूट लांब संरक्षक भिंत ढासळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 3:15 PM

निंबा फाटा(अकोला) : परिसरात १७ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कवठा बॅरेजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे बॅरेजचे दरवाजे उघडण्यात आले. या पाण्यामुळे धरणाच्या समोरील सिमेंटचे ब्लॉक व २०० फूट लांब संरक्षक भिंत अक्षरश: उखडली आहे.

ठळक मुद्दे२०० ते ३०० फूट सिमेंटचे ब्लॉक व दोन भिंती उभारण्यात आल्या होत्या.मुसळधार पावसानंतर गेटमधून पाणी सोडल्यानंतर या भिंती व ब्लॉक तुटून दूरपर्यंत फेकल्या गेले.

निंबा फाटा(अकोला) : परिसरात १७ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कवठा बॅरेजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे बॅरेजचे दरवाजे उघडण्यात आले. या पाण्यामुळे धरणाच्या समोरील सिमेंटचे ब्लॉक व २०० फूट लांब संरक्षक भिंत अक्षरश: उखडली आहे. यामध्ये कंत्राटदाराचे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.कवठा बँरेजचे समोरचे गेट उघडल्यानंतर पाणी आदळून जमीन खरडून जाऊ नये, याकरिता २०० ते ३०० फूट सिमेंटचे ब्लॉक व दोन भिंती उभारण्यात आल्या होत्या; मात्र काल झालेल्या मुसळधार पावसानंतर गेटमधून पाणी सोडल्यानंतर या भिंती व ब्लॉक तुटून दूरपर्यंत फेकल्या गेले. यामुळे कामाचे पितळ उघडे पडले असून, या बँरेजच्या अशा कामामुळे कवठा गावालाच भविष्यात धोका निर्माण झाला आहे. या संपूर्ण कामाची सखोल चौकशी करण्याची व निकृष्ट काम करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी सरपंच सुमेध घ्यारे यांनी केली आहे.(वार्ताहर)कवठा बॅरेजच्या गेटसमोर पाणी आदळून जमीन खरडून जाऊ नये, याकरिता उभारण्यात आलेल्या ब्लॉक व सिमेंट भिंतीचे काम अर्धवट असल्यामुळे पाण्याच्या दाबाने ते उखडून गेले. कंञाटदाराचे अंदाजे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे; मात्र कंत्राटदाराला हे काम नव्याने करून द्यावे लागेल. - -- दिलीप भालतिडक, अभियंता पाटबंधारे विभाग, अकोला.कवठा बँरेजचे काम गावाला लागूनच वरच्या बाजूस झाले आहे. पहिल्याच पाण्यात ब्लॉक व सिमेंटची भिंत ढासळली, त्यामुळे गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या बॅरेजच्या संपूर्ण कामाची सखोल चौकशी व्हावी.-  सुमेध घ्यारे, सरपंच कवठा. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDamधरण