२0 टक्के अनुदानित शाळांचे वेतन दिवाळीपूर्वी होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 18:27 IST2019-10-14T18:27:06+5:302019-10-14T18:27:22+5:30

शासनाने ११ आॅक्टोबर शिक्षण आयुक्तांना उणे प्राधिकारपत्र आदेश काढण्याचे आदेश दिले आहे.

20% of subsidized schools will be paid before Diwali! | २0 टक्के अनुदानित शाळांचे वेतन दिवाळीपूर्वी होणार!

२0 टक्के अनुदानित शाळांचे वेतन दिवाळीपूर्वी होणार!

अकोला: राज्यातील शाळांना शासनाने २0 टक्के अनुदान दिले होते. या शाळांमधीलशिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर, आॅक्टोबरच्या वेतन दिवाळीपूर्वी होणार आहे. शासनाने ११ आॅक्टोबर शिक्षण आयुक्तांना उणे प्राधिकारपत्र आदेश काढण्याचे आदेश दिले आहे.
शासनाने २0 टक्के अनुदान दिलेल्या शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह निवृत्ती वेतन धारकांचा दिवाळी सण उत्साहात आणि आनंदात पार पडावा. यासाठी माहे आॅक्टोबर आणि नोव्हेंबर २0१९ मध्ये देय होणार वेतन, निवृत्तीवेतन २४ आॅक्टोबरपूर्वी देण्याचे निश्चित केले होते. या शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांच्या वेतनाच्या दृष्टीकोनातून अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर आहरण व संवितरण अधिकाºयांनी उणे देयक प्राधिकारपत्र काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार २0१९-२0 या आर्थिक वर्षातील वेतनासाठी कमी पडणाºया रकमेची देयके उणे प्राधिकार अंतर्गत काढण्यात येणार आहे. शासनाच्या अवर सचिवांनी शिक्षण आयुक्तांना दिलेल्या पत्रामध्ये मागील थकीत वेतनाची देयके काढण्यात येऊ नयेत. आॅफलाइन पद्धतीने वेतन न काढता, शालार्थ प्रणालीच्या माध्यमातूनच वेतन देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 20% of subsidized schools will be paid before Diwali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.