अकोला : महाराष्ट्र कुंभार समाज विकास परिषदेने २0१७-१८ या वर्षात शैक्षणिक वर्षासाठी सर्व शाखीय कुंभार समाजातील २0 विद्यार्थी दत्तक योजनेसाठी पात्र ठरविले आहेत. परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण सावीकर, उद्योजक देवराव कापडे, पांडुरंग तळोकार यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यासाठी सावीकर यांनी स्वत: फिरून विद्यार्थी पात्र असल्याची खात्री केली. त्यांची यादी तयार केली. त्यामध्ये इयत्ता बारावीचे दर्शन किशोर सोनोने, सोनल विजय जोहार्ले, अकरावीतील अलका नामदेव थोटे, दहावीतील संदेश रामकृष्ण चांदूरकर, चैताली प्रकाश लाहुडकर, शुभम राजाराम सोनोने, नेहा प्रल्हाद हिवरकर, हर्षल रघुनाथ मेहरे, विशाल दिगंबर आगरकर, तर त्याखालील वर्गातील युगंधरा रामदास सरोदे, नयना दिलीप कापसे, सोमेश नीलेश सावरकर, कुणाल दिवाकर वाक्कर, तुषार भास्कर वाक्कर, वैष्णवी रामेश्वर घाटोळे, दिव्या गोपाळराव खानापुरे, यश गोपाळराव खानापुरे, तेजस्विनी संजय कोल्हे यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना समाजाच्यावतीने शालेय साहित्याचे वाटप केले जाणार आहे. योजनेच्या मदतीसाठी रामकृष्ण सावीकर फडके नगर, डाबकी रोड अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कुंभार समाजाने घेतले २0 विद्यार्थी दत्तक
By admin | Updated: June 12, 2017 13:34 IST