१९ वर्षीय मुलाने १७ वर्षीय मुलीस पळविले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 12:59 IST2019-09-06T12:59:29+5:302019-09-06T12:59:44+5:30

१७ वर्षीय मुलीस तिच्याच वर्गातील एका १९ वर्षीय मुलाने आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.

 A 19-year-old boy elope with 17-year-old girl | १९ वर्षीय मुलाने १७ वर्षीय मुलीस पळविले 

१९ वर्षीय मुलाने १७ वर्षीय मुलीस पळविले 

अकोला : सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका १७ वर्षीय मुलीस तिच्याच वर्गातील एका १९ वर्षीय मुलाने आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सदर युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात एका १७ वर्षीय मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे वडील मुलीला नेहमीप्रमाणे शिकवणी वर्गासाठी घेऊन गेले होते. सकाळी ११ वाजता पुन्हा तिला आणण्यासाठी गेले असता शिकवणी वर्गात ती आलीच नाही, असे सांगण्यात आले. यावेळी वडिलांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात मुलीला पळविल्याची तक्रार दिली. यावरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आरोपी पवन प्रमोद नागरे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३, ३६६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title:  A 19-year-old boy elope with 17-year-old girl