१९ के.एल. क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्लाँन्ट लवकरच सुरुवात होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:17 IST2021-03-20T04:17:38+5:302021-03-20T04:17:38+5:30
ऑक्सिजन जोडणी करता सेंट्रल पाईपलाईन टाकण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. येथे १० किलो लिटर क्षमतेचे लिक्विड ऑक्सिजन प्लाँन्ट उभारण्याची ...

१९ के.एल. क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्लाँन्ट लवकरच सुरुवात होणार!
ऑक्सिजन जोडणी करता सेंट्रल पाईपलाईन टाकण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. येथे १० किलो लिटर क्षमतेचे लिक्विड ऑक्सिजन प्लाँन्ट उभारण्याची प्रक्रिया करण्यात आलीे असून, प्लॉंन्ट लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आहे.
यापूर्वीच लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात ४० बेडचे कोविड हेल्थ केअर सेंटर कार्यांन्वित असून नियमित उपचार सुरु आहेत. ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झालेल्या निधीतून ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात असून, कार्यान्वीत करण्यासाठी आवश्यक विभागाच्या मुंबई ,पुणे येथील परवानगी पुढील आठवड्यात मिळणार असल्याची माहिती आहे. परवानगी मिळाल्यानंतरच प्लांटमधून रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होणार असल्याचे माहिती आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय अधिक्ष डॉ. विलास सोनोने व वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेन्द्र नेमाडे प्रयत्नशील होते. (फोटो)