कापशी येथे पर्यटनस्थळासाठी १.६१ कोटी मंजूर

By Admin | Updated: April 17, 2015 01:49 IST2015-04-17T01:49:30+5:302015-04-17T01:49:30+5:30

अकोला पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश.

1.61 crore sanctioned for tourism at Kapasi | कापशी येथे पर्यटनस्थळासाठी १.६१ कोटी मंजूर

कापशी येथे पर्यटनस्थळासाठी १.६१ कोटी मंजूर

अकोला: महापालिकेच्या मालकीच्या कापशी तलाव येथे पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी १ कोटी ६१ लाख रु पयांचा निधी मंजूर झाला. नगर विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून, मनपा प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार अवघ्या महिनाभरातच हा निधी पालक मंत्र्यांनी मंजूर केला. कापशी तलावाचे सौंदर्यीकरण व पर्यटनस्थळाचा मुद्या ह्यलोकमतह्णने सतत लावून धरला होता, हे येथे उल्लेखनीय. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कापशी तलावाच्या ठिकाणी पर्यटनस्थळ विकसित व्हावे, ही अकोलेकरांची अनेक वर्षांंपासूनची मागणी होती. जिल्ह्यातील निसर्गप्रेमींना दोन क्षण निवांत घालविण्यासाठी निसर्गरम्य स्थळाचा अभाव आहे. कधीकाळी अकोला शहराची तहान भागविणार्‍या कापशी तलावातून पाण्याचा उपसा बंद झाला. मनपाचे त त्कालीन आयुक्त चंद्रशेखर रोकडे यांनी सुस्थितीत असलेली बिडची पाइपलाइन काढून घेतली आणि भविष्यात कापशी तलावातून शहराला पाणीपुरवठा होण्याचे स्वप्न लांबणीवर गेले. आजरोजी तलावात केवळ मच्छीमारीचा व्यवसाय सुरू असून, याबदल्यात मनपाला अत्यल्प उत्पन्न प्राप्त होते. तलावाच्या ठिकाणी सौंदर्यस्थळ निर्माण व्हावे, याकरिता २0१0 मध्ये शासनाकडून प्राप्त झालेला निधी नियोजनाअभावी परत गेला होता. तत्कालीन आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या कार्यकाळात याठिकाणी सौंदर्यीकरणासाठी तांत्रिक सल्लागाराची नियुक्तीही करण्यात आली. परंतु या सर्व बाबी केवळ जर-तर ठरल्या. राज्याचे नगर विकास राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी मात्र कापशी तलावाला पर्यटनस्थळ बनविण्यासाठी नेटाने प्रयत्न केले. याकरिता मनपाच्या बांधकाम विभागाने मार्च २0१५ मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पर्यटनस्थळासाठी शासनाकडे निधीचा प्रस्ताव सादर केला. अवघ्या महिनाभरातच पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी १ कोटी ६१ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये जिल्हा नियोजन समितीमार्फत ९६ लाख तर प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत ६५ लाख निधीचा समावेश आहे.  

Web Title: 1.61 crore sanctioned for tourism at Kapasi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.