मूर्तिजापूरात १६ किलो गांजा जप्त; दहशदवात विरोधी पथकाची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 16:37 IST2021-09-01T16:36:49+5:302021-09-01T16:37:00+5:30

Cannabis seized in Murtijapur राष्ट्रीय महामार्गावर १ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. 

16 kg cannabis seized in Murtijapur; Action of anti-terror squad | मूर्तिजापूरात १६ किलो गांजा जप्त; दहशदवात विरोधी पथकाची कारवाई 

मूर्तिजापूरात १६ किलो गांजा जप्त; दहशदवात विरोधी पथकाची कारवाई 

मूर्तिजापूर : अमरावतीवरुन मूर्तिजापूर शहरात गांजा विक्रीसाठी आलेला १६ किलो गांजा दहशदवाद विरोधी पथकाने हस्तगत केला. राष्ट्रीय महामार्गावर १ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. 
         अमरावती येथून अॉटो रिक्षातून गांज्याची वाहतूक करतांना अॉटो रिक्षासह  तब्बल १६ किलो गांजा असा ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल अकोला दहशवादी पथकाने जप्त केला आहे. बुधवारी १ सप्टेंबर रोजी दहशतवाद विरोधी पथक  हे मूर्तिजापुर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहिती नुसार अमरावती वरुन मूर्तिजापूर येथे गांजा विक्री करण्यासाठी ऑटो रिक्षा क्रमांक एम एच २७ बी डब्ल्यू ५१७१ मध्ये आणत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यावरुन -अमरावती मूर्तिजापूर बायपासवर कारंजा टी पॉइंट येथे नाकाबंदी करून ऑटो रिक्षाची तपासणी कली असता समोरील शीट खाली गांजा भरलेली प्लास्टिक पिशवी दिसून आली. या प्रकरणी चालक शेख आसिफ शेख यूसुफ (२९) रा. रहमतनगर अमरावती याला ताब्यात घेण्यात आले.  किलो गांजा कीमत १ लाख ६० हजार किंमतीचा गांजा व ऑटो रिक्शा किंमत २ लाख रुपये व एक मोबाइल किमत १० हजार रुपये असा ३ लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Web Title: 16 kg cannabis seized in Murtijapur; Action of anti-terror squad