शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ात सिकलसेलचे १३७ रुग्ण!

By admin | Updated: June 19, 2015 02:47 IST

आज जागतिक सिकलसेल दिन; ४,२७,२११ लोकांची तपासणी; २0६६ जण वाहक.

अतुल जयस्वाल / अकोला : सिकलसेल हा रक्ताशी संबंधित विकार असून, जनुकीय दोषांमुळे हा आजार होतो. जिल्हय़ात या आजाराचे १३७ रुग्ण असून, २0६६ लोक या आजाराचे वाहक असल्याचे आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीतून पुढे आले आहे. हिमोग्लोबिनमध्ये दोष निर्माण करणार्‍या या आजारावर कोणताही खात्रीलायक उपाय अद्यापपर्यंंत उपलब्ध नसला, तरी योग्य देखभाल व लक्षणांनुसार उपाययोजना केल्यास हे रुग्ण सामान्य जीवन जगू शकतात. सिकलसेलबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १९ जून हा जागतिक सिकलसेल दिवस म्हणून साजरा केला जातो. या रोगाबाबत लोकांमध्ये प्रचंड अज्ञान असून, अनेकांना या रोगाबाबत माहिती नाही. हा आजार झालेल्या रुग्णांच्या रक्तपेशी कोयत्याच्या आकाराच्या होतात. रुग्णाची बाहय़तपासणी करून त्याचे निदान करता येत नाही. याकरिता रुग्णाची ह्यहिमोग्लोबीन इलेक्टोफोरोसीसह्ण ही विशिष्ट चाचणी करावी लागते. या आजारात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. रक्तपेशी कोयत्याच्या आकाराच्या झाल्यामुळे त्या एकमेकांना जोडल्या जाऊन, रक्तवाहिन्यांमध्ये अडकून पडतात. त्यामुळे रुग्णांच्या हाता-पायांमध्ये प्रचंड वेदना होतात. अशावेळी रुग्णांना बाहेरून रक्त द्यावे लागते. जिल्हय़ात २0११-१२ पासून सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून, आतापर्यंत ४,२७,२११ लोकांची तपासणी आरोग्य विभागामार्फत करण्यात आली आहे. यामध्ये १३७ लोकांना हा आजार असल्याचे आढळून आले असून, २0६६ जण या आजाराचे वाहक (कॅरिअर) आहेत. वाहक असलेल्यांमध्ये कोणतीही लक्षणे आढळत नाहीत. या आजारावर थेट उपचार नाहीत. रुग्णांमध्ये दिसणार्‍या लक्षणांप्रमाणे त्यांच्यावर उपाययोजना करावी लागते. या आजारावर कायमस्वरूपी उपचार करता येतात का, याबाबत संशोधन सुरू आहे.